पुणे - सराफ दुकानातून पावणेदोन कोटींचे सोने चोरून कारागीर पसार झाल्याची घटना गणेश पेठेत घडली. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात पाच कारागिरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सराफ व्यावसायिक जमीर इब्राहिम शेख (वय ४५, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून कारागीर महम्मद मिथुन शेख ऊर्फ अँटीक, राहुल, शमीम, सनी शेख, राजीव शेख (सर्व मूळ रा. पश्चिम बंगाल) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराफ व्यावसायिक जमीर शेख यांचे गणेश पेठेत झेड ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात दागिने घडविण्यात येतात. शेख यांच्याकडे आरोपी महम्मद शेख काही वर्षांपासून दागिने घडवून देण्याचे काम करीत होता. महम्मद याच्यावर विश्वास असल्याने त्यांनी त्याच्याकडे तिजोरीच्या चाव्या दिल्या होत्या.
परंतु महम्मद आणि त्याचे नातेवाईक तिजोरीतून एक कोटी ८० लाख रुपये किमतीचे साडेचार किलो सोने चोरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.