पुण्यातच मिळणार गुगलची नोकरी; नवं ऑफिस आता पुण्यात!

google
googlesakal
Updated on

पुणे: गुगल (Google) ही आयटी क्षेत्रातील एक मोठी कंपनी आहे. आयटी क्षेत्रात गुगलचे अधिराज्य निर्विवाद आहे. प्रत्येक आयटी कर्मचाऱ्याला गुगलमध्ये काम करण्याची इच्छा मनोमन असते. महाराष्ट्रातील आयटी हब म्हणजे पुणे होय..! आता पुण्यातील आयटी इंजिनिअर्ससाठी खुशखबर आहे. गुगलचं ऑफिस आता पुण्यातही उभारलं जाणार आहे. त्यामुळे अनेक आयटी इंजिनिअर्सना पुण्यातच गुगलसाठी काम करता येणार आहे. २०२२ वर्षाच्या उत्तरार्धात पुण्यामध्ये हे नवं ऑफिस उघडलं जाणार आहे. (Google is opening a new office in Pune)

google
असे आहेत २०२२ च्या पद्म पुरस्कारांचे मानकरी; वाचा सविस्तर

क्लाउड प्रोडक्ट इंजिनिअरिंग, टेक्निकल सपोर्ट आणि ग्लोबल डिलीव्हरी सेंटर ऑर्गनायझेशन यासाठी गुगल नव्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहे. "गुडगाव, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये सध्या गुगल गरजेनुसार नव्या कर्मचाऱ्यांची भरती करत आहे, अशी माहिती माउंटन व्ह्यू या गुगलच्या मुख्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निवेदनात देण्यात आली आहे.

google
राज्यातील महाविद्यालयांबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Google सध्या अमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) आणि मायक्रोसॉफ्टशी स्पर्धा करू पाहत आहे. यासाठी गुगल प्रमुख नेतृत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करत आहेत. देशात आक्रमकपणे आपला क्लाउड विभाग तयार करण्याच्या प्रयत्नात कंपनी आहे.

भारतातील क्लाउड इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष अनिल भन्साळी म्हणाले की, " एक आयटी हब म्हणून पुण्यातील विस्तार आम्हाला फायद्याचा ठरणार आहे. आमच्या वाढत्या ग्राहक वर्गासाठी प्रगत क्लाउड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स, उत्पादने आणि सेवा विकसित करत राहिल्यामुळे आम्हाला उत्कृष्ट कर्मचारी मिळण्यासाठी पुण्याचा फायदा होईल."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()