Pune News : सरकारला अजूनही महिला धोरणात बदल करण्याची गरज; शरद पवार

मुलींना हिस्सा दिला तर कौटूबिक वाद होतील असे आमचे लोक सांगायचे पण त्याचा फायदा मी समजून सांगितला आणि महिला आरक्षणाचा कायदा पास झाला.
Government needs to change women policy Sharad Pawar pune
Government needs to change women policy Sharad Pawar punesakal
Updated on

वारजे : महिलांना आरक्षण देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. त्यावेळी याला खूप विरोध झाला. तरीही महिलासाठी असणारे कायदे आम्ही पास केले. अजूनही महिला धोरणात अनेक बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करत राहणार आहोत. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारजे येथे केले.

Government needs to change women policy Sharad Pawar pune
Pune Crime : सुसंस्कृतपणाची ख्याती असलेलं पुणं इतकं हिंस्त्र नव्हतं! अजित पवार संतापले

वारजे येथील अन्नपूर्णा परिवाराच्या संस्थेची माहिती घेताना पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले आमचं सरकार असताना महिलांना सन्मानाने जगता यावे म्हणून अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मुलींना हिस्सा दिला तर कौटूबिक वाद होतील असे आमचे लोक सांगायचे पण त्याचा फायदा मी समजून सांगितला आणि महिला आरक्षणाचा कायदा पास झाला.

लष्करात देखिल आम्ही मुलींना स्थान दिल यावेळीही विरोध झाला मात्र त्याला न जुमनता मी संरक्षण मंत्री असताना निर्णय घेतला. आणि आता मुलीही पायलट दिसू लागल्या आहेत. त्यामुळे मुलींना कमी लेखू नये.

Government needs to change women policy Sharad Pawar pune
Pune Student Attack : 'मी कोयता वरच्या वर पकडला अन्..' वाचवणाऱ्या मुलाने सांगितला घटनेचा थरार

मुली अनेक गोष्टी करू शकतात. त्यासाठी अजूनही महिला धोरणात बदल करणे गरजेचे आहे. अन्नपूर्णा परिवारही महिलासाठी मोलाचे कार्य करत आहे.असेही पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी अन्नपूर्णा परिवाराच्या चित्रा खिंगसारा, माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके व अन्नपूर्णा परिवारातील महिला उपस्तित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.