कोरोनावर मात करण्यासाठी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य : अजित पवार

Ajit Pawar
Ajit PawarFile Photo
Updated on

बारामती : कोरोनावर मात करण्याच्या उपाययोजनांना राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे, या शिवाय तिसरी लाट येणार या बाबतही चर्चा सुरु आहे, लहान मुलांना या संकटापासून दूर ठेवण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्याचे नियोजन केलेले आहे, ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होण्याबाबतही राज्य सरकारने प्रयत्न केलेले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. (Government top priority to overcome Corona Said Ajit Pawar)

बारामतीत आज घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पवार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यासह मुलभूत सुविधांसाठी निधीही उपलब्ध करुन दिला आहे, तिसरी लाट येऊ नये अशीच सर्वांची इच्छा आहे, पण लाट आलीच तर त्याला सामोरे जाण्यासाठीची सर्व तयारी सरकारने केली आहे.

Ajit Pawar
नौदल प्रमुखांनी पुण्यातील कॅडेट्सना दिलं पुश अप चॅलेंज; पाहा PHOTO

लसीकरणाचा कार्यक्रम सरकारला तातडीने व मोठ्या प्रमाणावर राबवायचा आहे, या कामासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूदही सरकारने केली आहे, मात्र दुर्देवाने देशात ज्या कंपन्या लस तयार करतात, त्यांच्याकडून तेवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत नाही म्हणून मोफत लसीकरण कार्यक्रमाला अडचणी येत आहे. या मध्ये आम्ही केंद्राला विनंती केली आहे की परदेशातील ज्या लसी मान्यताप्राप्त आहे अशा लसी आणणे व लोकांना देण्याची परवानगी द्यावी.

कृषीपूरक दुकाने उघडण्याची सरकारने परवानगी दिली आहे, शेतक-यांना अडचणी येऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत. कोरोनाकाळात आपला विकासदर कृषी क्षेत्राने सांभाळण्याचेच काम केले आहे. यंदा पाऊस चांगला आहे असे हवामानखात्याने सांगितले आहे. सर्व शेतक-यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्जही उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Ajit Pawar
ठाकरे सराकारविरोधात पडळकरांचा हक्कभंग प्रस्ताव

मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या आहेत, या बाबत विचारले असता पवार म्हणाले, लोकशाही मध्ये प्रत्येकाला कोणालाही भेटण्याचा आपल म्हणण मांडण्याचा अधिकार आहे, मराठा आरक्षणानंतर राज्य सरकारनेही इतर कोणत्याही वर्गाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाल पाहिजे म्हणून जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे तशी खबरदारी राज्य सरकार घेत आहे. त्यात न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती केली आहे, तेही त्याचा अभ्यास करत आहेत. अशोक चव्हाण हेही अभ्यास करीत आहेत. सरकार सर्वच जातीधर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी सकारात्मक आहे, यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.

छत्रपती संभाजीराजेही तोच प्रयत्न करीत आहेत, असा प्रयत्न करणारे जे मान्यवर असतील, त्याच्यात राजकारण न आणता त्या वर्गाला न्याय देण्याकरीता ज्यांची मानसिकता आहे अशा मान्यवरांसोबत सरकार आहे.

Ajit Pawar
पुण्यात पॉझिटिव्हीटी रेट घटला; एका दिवसात ५७३ नवे रुग्ण

चंद्रकांत पाटील झोपेत बोलले की जागे असताना...

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत बोलतांना अजित पवार यांनी ते झोपेत असताना बोलले की जागे असताना असा खोचक सवाल करत पाटील यांची खिल्ली उडवली. ज्या दिवसापासून महाविकासआघाडीचे सरकार आले त्या दिवसापासून त्यांना असह्य झाल आहे, त्यांना आपण सरकारमध्ये नाही ही सतत बोचणी लागून राहिली आहे, आपल्या सगळ्यात जास्त जागा येऊन आपण सरकारमध्ये नाही, त्या मानसिकतेतून ते बाहेरच यायला तयार नाहीत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी इकडे तिकडे जाऊ नये, त्या मुळे सतत एक पुडी सोडण्याचे काम पाटील करतात. जोवर सोनिया गांधी, शरद पवार व उध्दव ठाकरे एकत्र आहेत तो वर सरकारला काहीही धोका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()