Pune News : आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील 55 महा-ई सुविधा केंद्र शनिवारी व रविवारी सुरू राहणार - गोविंद शिंदे

महाविद्यालयीन प्रवेश, विविध विभागांच्या भरतीसाठी आवश्यक असलेला उत्पन्नाचा, जातीचा, नॉन-क्रिमिलेअर, आर्थिक दृष्ट्या मागास आदी प्रमाणपत्रांची आवश्यकता
govind shinde statement 55 Maha-e Suvidha Kendra ambegaon junnar open on saturday and sunday pune
govind shinde statement 55 Maha-e Suvidha Kendra ambegaon junnar open on saturday and sunday puneesakal
Updated on

मंचर : विद्यार्थ्यांच्या विविध दाखल्यांसाठी जुलै महिन्या अखेर पर्यंत शनिवारी व रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील ५५ महा-ई-सेवा केंद्र सुरू राहतील. तसेच जुन्नर व आंबेगाव तहसील कार्यालय व मंचर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील संबधित अधिकारी व कर्मचारी शनिवारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दाखले वेळेत मिळू शकतील.”

govind shinde statement 55 Maha-e Suvidha Kendra ambegaon junnar open on saturday and sunday pune
Pune Municipal : मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या तक्रारींकडेही महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी करतात दुर्लक्ष

अशी माहिती आंबेगाव व जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. ते म्हणाले “आंबेगाव व जुन्नर तालुक्यात जवळपास ५५ महा-ई सुविधा केंद्र आहेत. महाविद्यालयीन प्रवेश, विविध विभागांच्या भरतीसाठी आवश्यक असलेला उत्पन्नाचा, जातीचा, नॉन-क्रिमिलेअर, आर्थिक दृष्ट्या मागास आदी प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. हे दाखले विद्यार्थ्यांना वेळेत उपलब्ध व्हावेत. अश्या सूचना महा-ई सुविधा केंद्र चालकांना दिल्या आहेत. त्याचेही चांगले प्रशासनाला सहकार्य मिळत आहे.”

govind shinde statement 55 Maha-e Suvidha Kendra ambegaon junnar open on saturday and sunday pune
Nashik-Pune Railway: नाशिक-नगर-पुणे रेल्वे मार्गाचं काम कुठे अडलंय? कधी सुरु होणार?; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

“अवसरी खुर्द, मंचर, घोडेगाव, जुन्नर, ओतूर, बेल्हा, आळेफाटा आदी एकूण ५५ महा-ई सुविधा केंद्रामध्ये शनिवारी (ता.१५) पालक व विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती.दररोज ४०० हून अधिक दाखले वितरीत केले जातात.”असे प्रांत कार्यालयातील नायाब तहसीलदार सचिन मुंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.