Recruitment : सरकारी भरती, महिनोंमहिने थांब! समाजकल्याणची भरती रखडली; अर्ज भरल्यानंतरही परीक्षेची तारीख नाही

समाजकल्याण विभागात तब्बल १२ वर्षानंतर गट ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील ८१ जागांची भरती जाहीर करण्यात आली.
govt job recruitment samaj kalyan job application exam pending mpsc
govt job recruitment samaj kalyan job application exam pending mpscSakal
Updated on

Pune News : समाजकल्याण विभागात तब्बल १२ वर्षानंतर गट ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील ८१ जागांची भरती जाहीर करण्यात आली. त्यासाठी मे २०२३ मध्ये अर्जही भरून घेण्यात आले. मात्र, आज सात महिने उलटले तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) परीक्षेच्या तारखे संदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आली नाही.

त्यातही २०२४ च्या परीक्षांच्या वेळापत्रकात समाजकल्याणाच्या भरतीला स्थान नसल्याने उमेदवार हवालदिल झाले आहे. मे २०२३ मध्ये समाजकल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी, गृहप्रमुख या अधिकारी पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयोगाने १५ मे ते ५ जून दरम्यान अर्जही भरून घेतले.

मात्र, आजतागायत परीक्षेसंदर्भात कोणतीच घोषणा केलेली नाही. उमेदवार सूरज गायकवाड (नाव बदललेले) सांगतो, ‘‘राज्यातील सरळसेवा भरतीत प्रचंड गोंधळ असून, सातत्याने वादग्रस्त ठरत असल्याने त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.

त्यामुळे एमपीएससीद्वारे आयोजित भरती प्रक्रियेत प्रामाणिक अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी सहभागी होतात. आम्हीपण मागच्या वर्षी मोठ्या आशेने या भरती प्रक्रियेत सहभागी झालो. आमच्याकडून अर्जही भरून घेतले. अभ्यासक्रमही घोषित केला. मात्र, त्या परीक्षेबद्दल अजून कोणतीच माहिती नाही. त्यामुळे आम्ही सर्वच अडचणीत सापडलो आहोत.’’ एमपीएससीने तातडीने दखल घेत परीक्षा पार पाडावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

समाजकल्याणच्या जाहिरातीचा तपशील

- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट-अ ः ४१ जागा

- समाज कल्याण अधिकारी गट- ब ः २२ जागा

- गृहप्रमुख गट-ब ः १८ जागा

उमेदवारांच्या अडचणी

- परीक्षा नक्की केंव्हा होणार याबद्दल अनभिज्ञता

- अभ्यासाचे नियोजन करता येत नाही

- दूसऱ्या परीक्षांच्या तयारीबद्दलही अनिश्चितता राहते

- परीक्षा रद्द होण्याची भीती

एमपीएससीने २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पदभरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. परंतु त्यात समाज कल्याण अधिकारी पदभरतीचे वेळापत्रकच नाही. आधीच लांबलेली परीक्षा आणि अनिश्चिततेच्या गर्तेत उमेदवार अडकले असून, तातडीने वेळापत्रक जाहीर करत दिलासा द्यावा, हीच अपेक्षा.

- मुग्धा सगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.