Gram Panchayat Election : वेल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी 82.28% मतदान; सर्वत्र मतदान शांततेत

तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
velhe
velhe sakal
Updated on

वेल्हे - वेल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी तालुक्यातून 82.28% मतदान झाले असून सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असल्याची माहिती वेल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली.

वेल्हे तालुक्यातून एकूण सात ग्रामपंचायत निवडणुकांपैकी सहा ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया तर एका ठिकाणी पोटनिवडणूक असा कार्यक्रम राबविण्यात आला होता.

वेल्हे तालुक्यामध्ये सर्वाधिक मतदान हे पानशेत खोऱ्यातील कादवे ग्रामपंचायत मध्ये झाली या ग्रामपंचायतीमध्ये 91.79% मतदान झाले

तर सर्वात कमी साईव बुद्रुक येथे 56 टक्के मतदान झाले.

तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 16 मतदान केंद्रावर मतदान झाले. त्यासाठी 96 कर्मचारी व अधिकाऱ्यांसह पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला होता. यामध्ये एकूण 16 पथके तयार करण्यात आली होती यामध्ये पाच झोनल ऑफिसर व दहा सहायक म्हणून झोनल ऑफिसर यांचा समावेश करण्यात आला होता.

velhe
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान; कराडात सकाळपासून मोठा पोलिस बंदोबस्त, 270 कर्मचाऱ्यांची नेमणूक

कादवे ग्रामपंचायत मध्ये 1060 मतदारांपैकी 973 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या ठिकाणी 91.79% मतदान झाले. तर कुरण खुर्द येथे 1404 मतदारांपैकी 1090 मतदारांनी हक्क बजावला या ठिकाणी 77.64% मतदान झाले तर शेणवड पोट निवडणुकीमध्ये 401 मतदारांपैकी 293 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या ठिकाणी 73% मतदान झाले असल्याची माहिती मिळण्याची तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.