सोमेश्वरनगर : गावाच्या विकासासाठी अन्य कुठल्याही निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायतीचीच निवडणूक महत्वाची असते हे ओळखून एका दांपत्याने चक्क दुबईहून विमानाने थेट गडदरवाडी (ता. बारामती) येथे येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांचा यासाठी जवळपास दीड लाख रूपये खर्च होणार आहे. मात्र यातून प्रत्येक मत लाखमोलाचे असते हे त्यांच्या कृतीने सिध्द झाले आहे. गडदरवाडी येथील सचिन गोकुळ लकडे व सरिता सचिन लकडे या दांपत्याने ग्रामपंचायतीत मतदान करता यावे यासाठी दोन दिवसांपूर्वीच विमानाने गाव गाठले. सचिन लकडे हे दुबईमध्ये एअरपोर्टवर सोळा वर्षांपासून सेवेत आहेत. सहकुटुंब दुबईतच राहतात.
गडदरवाडी या सात सदस्यीय ग्रामपंचायतीत फक्त १०१३ मतदार असून निवडणूक चुरशीची आहे. आपल्या विचाराच्या व्यक्तीला मत देऊन सत्तेवर बसविता यावे लकडे दांपत्य थेट दुबईहून मुलांसह गावात पोचले. आज दुपारी दांपत्याने सोबतच मतदानाचा अधिकार बजावला. कुटुंबाचा दुबईहून येण्या-जाण्यासाठी किमान दीड लाख रूपये खर्च होणार आहे. असे असतानाही लाखमोलाचे मत देण्यासाठी ते आल्यामुळे परिसरात कौतुक होत आहे. सकाळशी बोलताना सचिन लकडे म्हणाले, आई-वडिलांच्या आशिर्वादाने माझ्या कुटुंबाला चांगले दिवस पहायला मिळाले.
पण माझ्या गावात अजूनही पन्नास कुटुंब हातावरचे पोट असणारी आहेत काही कुटुंब मागास आहेत. त्यांचे पोटापाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांची प्रगती होण्यासाठी तसेच गावातील लोकांना दर्जेदार शिक्षण, वीज, स्वच्छ पाणी अशा पायाभूत सुविधा सर्वांना मिळाव्यात असे वाटते. हे काम मी दुबईत बसून फार करू शकत नाही. त्यासाठी आपल्या विचाराचे लोक ग्रामपंचायतीत बसले तर ते मार्गी लावू शकतील असे वाटते. या भावनेतून मताचा अधिकार बजावायला आम्ही दांपत्या आलो आहोत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.