Pune News: जारकरवाडी ता. आंबेगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कौसल्या संतोष भोजणे यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडीनंतर लगेचच सरपंच प्रतीक्षा कल्पेश बढेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या बैठकीत आम्ही सर्व सदस्य एकमताने ठराव मंजूर करत उपसरपंचपदी अजून एक सदस्य सचिन बाप्पू टाव्हरे यांची
निवड करत असुन राज्यात जसे एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत त्याप्रमाणे दोन उपसरपंच म्हणुन अधिकृतरित्या जाहीर करावे अशा प्रकारची मागणी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या अर्जाव्दारे केली असल्याने येथील उपसरपंच निवडणूक तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भक्ती शक्ती प्रतिष्ठाण चे संस्थापक व भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी संचालक उद्योजक रमेश लबडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत भक्ती शक्ती पॅनेलचे सरपंच पदा सह एकूण सर्वच्या सर्व दहा सदस्य बिनविरोध निवडून आले असून सदस्यपदाची एक जागा रिक्त राहिली आहे.
आज सरपंच प्रतीक्षा बढेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंचपदासाठी कौसल्या भोजणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली यावेळी सदस्य सचिन टाव्हरे, सुरेश एकनाथ मंचरे, सुभाष पिराजी लबडे, श्रावण बबन काकडे, श्याम मल्हारी बढेकर, पुष्पा शिवाजी जारकड, सुवर्णा एकनाथ भांड, अलका कैलास कापडी, रुपाली शिवाजी कजबे उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच कौसल्या भोजणे, सरपंच प्रतीक्षा बढेकर व सर्व सदस्यांचे उद्योजक रमेश लबडे यांनी अभिनंदन केले आहे.
त्यानंतर सरपंच, नवनिर्वाचित उपसरपंच व सर्व सदस्य यांनी एकमताने ठराव मंजूर करत राज्यात जसे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्याप्रमाणे दोन उपसरपंचाच्या नावाला अधिकृत मंजुरी द्यावी अशा प्रकारचे पत्र जिल्हाधिकारी यांना पाठवून दुसरे उपसरपंच म्हणुन सचिन टाव्हरे यांना अधिकृत मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे.
याबाबत उपसरपंच निवडणूक सचिव तथा ग्रामसेवक तुकाराम मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले उपसरपंच पदाची निवडणूक नियमाप्रमाणे झाली असून त्यामध्ये उपसरपंच पदी कौसल्या भोजणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
त्यानंतर सरपंच व सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे वेगळा अर्ज करून उपसरपंच पदासाठी कौसल्या भोजणे व सचिन टाव्हरे या दोन नावांना मान्यता द्यावी असा ठराव केला आहे. त्यांचा अर्ज वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.