Gram Panchayat Election Results : रांजणगाव सांडस सरपंचपदी प्रदीपा रणदिवे

विरोधी श्री गणेश संतराज महाराज परिवर्तन पॅनला सहा जागेवरती समाधान मानावे लागले आहे.
grampanchyat
grampanchyat sakal
Updated on

रांजणगाव सांडस - शिरूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या रांजणगाव सांडस (ता.शिरूर )ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत श्री भैरवनाथ संत बाळूमामा ग्रामविकास पॅनलच्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या माजी संचालिका सरपंचपदी प्रदीपा संभाजी रणदिवे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत सदस्य पदाच्या सात जागा मिळवून सत्ता राखण्यास यश मिळाले आहे .

विरोधी श्री गणेश संतराज महाराज परिवर्तन पॅनला सहा जागेवरती समाधान मानावे लागले आहे.ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. या ठिकाणी श्री भैरवनाथ पॅनल व श्री संतराज महाराज पॅनल यांच्यात सरपंचपदासह सदस्य पदासाठी अत्यंत चुरशीची व अटीतटीची निवडणुक झाली. १३ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अकरा जागासाठी २२ उमेदवार रिंगणात होते.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी श्री भैरवनाथ संत बाळूमामा ग्रामविकास पॅनलच्या वार्ड क्रमांक चार मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी( ओबीसी )राखीव असलेल्या जागेसाठी स्वाती अतुल लोखंडे व वार्ड क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवरती सुवर्णा कृष्णा रणदिवे या दोन महिला बिनविरोध निवडून आल्या होत्या. श्री भैरवनाथ पॅनलचे विजय उमेदवार पुढीलप्रमाणे:

grampanchyat
Gram Panchayat Election Results: बारामतीत अजित पवार गटाचे वर्चस्व तर रोहित पवारांचे गंभीर आरोप म्हणाले, 'स्वतःची पाठ थोपटून...पैसे...'

अजित दिलीप रणदिवे, जना गणेश पाटोळे, रोहिणी अमोल काळभोर, नवनाथ भाऊसाहेब राक्षे, दत्तात्रेय राजाराम आसवले. विरोधी श्री संतराज महाराज पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : प्रवीण प्रमोद रणदिवे, विशाल विलास रणपिसे, अश्विनी प्रवीण रणदिवे, मंदा दत्तात्रेय भंडलकर, जयश्री अशोक भोसले, शुभम संजय पाटोळे .

विजय श्री भैरवनाथ संत बाळूमामा ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक झुंबरअण्णा उर्फ तुकाराम रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संतोष रणदिवे, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी संचालक जीवन तांबे, बबनदादा रणदिवे, माजी सरपंच उत्तम लोखंडे, सोसायटीचे माजी अध्यक्ष चिमाजी रणदिवे ,संजय काळभोर आदींनी केले.तर विरोधी श्री संतराज महाराज पॅनलचे नेतृत्व साखर कारखान्याचे संचालक शरदराव निंबाळकर ,सोसायटीचे माजी अध्यक्ष वसंतराव( वसुकाका) रणदिवे आदींनी केले.

grampanchyat
Gram Panchyat Election Result : ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा कौल काँग्रेसच्या बाजुने

निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी मनीषा खैरे यांनी काम पाहिले. कोट: गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असून गाव आदर्श करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी गट, तट न पाहता सहकार्य करावे. प्रदीपा संभाजी रणदिवे - नुतन सरपंच, रांजणगाव सांडस (ता.शिरूर )

वार्ड क्रमांक चार मधील सदस्यपदाच्या सर्वसाधारण जागेसाठी विशाल विलास रणपिसे व राजेंद्र बबन रणपिसे या दोन उमेदवारांना समान मते मिळाली.त्यामुळे या दोघांच्या नावाच्या चिठ्ठया टाकण्यात आल्या. चिठ्ठ्याद्वारे घेतलेल्या मतदानात सदस्य पदासाठी विशाल विलास रणपिसे तयार यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांच्या गळ्यात सदस्य पदाची माळ पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.