Grampanchyat Election : जुन्नर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर ; १५ ग्रामपंचायतीच्या रिक्त पदासाठी पोटनिवडणूक

संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.
pune
punesakal
Updated on

जुन्नर - (दत्ता म्हसकर) जुन्नर तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या २६ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचासह सदस्य पदांसाठी तसेच एका ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासह १५ ग्रामपंचायतीच्या ३१ रिक्त पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस व नायब तहसीलदार सरिता रासकर यांनी दिली.

संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे :- सांगणोरे, आंबेगव्हाण, डुंबरवाडी, वडगांव आनंद, पिंपळवंडी, निमगिरी, खटकाळे, खामगांव,धालेवाडी तर्फे मिन्हेर, राळेगण,पाडळी, सुकाळवेढे, बुचकेवाडी, पारुंडे, कांदळी, नारायणगांव, शिरोली तर्फे आळे, गुंजाळवाडी(बेल्हे),बांगरवाडी,गुळंचवाडी,बेल्हे,रानमळावाडी, पिंपरीकावळ, उंब्रज नंबर १,पांगरी तर्फे मढ,तांबेवाडी.

वानेवाडी ग्रामपंचायतीचे थेट सरपंच पदासह ७ सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज न आल्याने रिक्त पदासाठी तसेच काले-२, भिवाडे बुद्रुक-३, अहिनवेवाडी-१,खिलारवाडी-२,मढ-३, हातविज-३,उंडेखडक-१, अंजनावळे-२,माणिकडोह-२,खानापूर-१,पिंपळगांव तर्फे नारायणगाव -१, येथील जागांसाठी अर्ज न आल्याने तर आंबोली-२,उच्छिल-१ सोमतवाडी-१ येथील सदस्यांनी राजीनामा दिल्याने १५ ग्रामपंचायतीच्या ३१ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.

रिक्त पदांपैकी अर्ज न आल्याने अनुसूचित जमातीच्या २१ महिलांची पदे निवडणूक झाल्यापासून रिक्त राहिली आहेत. महिलांकडे जातीचा दाखला नसल्याने बहुतेक जागा रिक्त राहतात.

pune
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

निवडणूक कार्यक्रम : शुक्रवार ता.६ ऑक्टोबर रोजी तहसिलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करणे :-

सोमवार ता. १६ ते शुक्रवार ता.२० ऑक्टोबर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यत.

नामनिर्देशनपत्र छाननी :- सोमवार ता.२३ रोजी सकाळी ११ पासून छाननी संपेपर्यंत

pune
Sangli News : १९ गावांच्या पाणी प्रश्नासाठी सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचे उपोषण 'ह्या' आहेत मागण्या

उमेदवारी माघारी :- बुधवार ता.२५ दुपारी ३ वाजेपर्यत.

निवडणूक चिन्ह तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द बुधवार ता.२५ दुपारी ३ नंतर.

मतदान :- रविवार ता.५ नोव्हेंबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यत.

मतमोजणी व निकाल सोमवार ता.६ नोव्हेंबर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.