Pune News : वरसगावच्या ग्रामसेवकास पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

वडिलोपार्जित घराच्या वारस नोंदीसाठी शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना वरसगाव ( ता.वेल्हे, राजगड)चे ग्रामसेवक विठ्ठल वामन घाडगे ( वय ४४, रा. वरसगाव ) यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
gramsevak of Warsgaon being caught red-handed taking bribe of 5000 rupees
gramsevak of Warsgaon being caught red-handed taking bribe of 5000 rupeesSakal
Updated on

वेल्हे,( पुणे) : वडिलोपार्जित घराच्या वारस नोंदीसाठी शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना वरसगाव ( ता.वेल्हे, राजगड)चे ग्रामसेवक विठ्ठल वामन घाडगे ( वय ४४, रा. वरसगाव ) यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

हा प्रकार परवा बुधवारी ( ता. २७)रोजी पुण्यातील राजाराम पुला जवळील कर्वेनगर येथील मातोश्री वृद्धाश्रमा जवळ घडला. तक्रारदार शेतकरी यांचे वरसगाव येथे वडिलोपार्जित घर आहे. या मिळकतीच्या क्षेत्राच्या नोंदीत दुरुस्त करुन घराच्या ८ उताऱ्यावर तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावांची वारस नोंद करण्यासाठी तक्रारदार ग्रामपंचायतीत अर्ज केला होता.

त्यासाठी ग्रामसेवक विठ्ठल घाडगे याने तक्रारदार यांच्याकडे ५ हजारांची लाच मागितली होती. पाच हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने घाडगे याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पुण्यातील वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण या तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.