हडसरला बसविणार लाकडी महादरवाजा; सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांचा उपक्रम

हडसरला बसविणार लाकडी महादरवाजा; सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांचा उपक्रम
Updated on

जुन्नर : ऐतिहासिक हडसर उर्फ पर्वतगडावर भव्य सागवानी प्रवेशद्वार बसविण्यात येणार आहे. यामुळे गडाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी हा उपक्रम हाती घेऊन तो पूर्ण केला आहे. रविवार (ता. १३) हा महादरवाजा सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी अथक मेहनतीने गडावर नेण्यात आला.

यासाठी राज्यातील अनेक दुर्गसेवक आवर्जून उपस्थित होते. हा सागवानी लाकडाचा सुबक असा महादरवाजा अकोले जिल्हा अहमदनगर येथील भास्कर गोरे यांनी बनविला आहे. या महाद्वाराचे वजन सुमारे सहाशे किलो आहे.

गेल्या काही वर्षात हडसरच्या प्रवेशद्वाराशी लहान मोठ्या दगडांचा खच पडला होता. अनेकांजण या दगडातून वाट काढत पुढे जात. येथील हे मोठे दगड बाजूला करून त्या महादरवाजास मोकळा श्वास देण्यासाठी सह्याद्रीचे दुर्गसेवक पुढे आले. 
हलवून बाजूला न करता येणारे मोठं मोठे दगड पूर्ण फोडून तो दरवाजातील मार्ग मोकळा केला. आणि त्याला सागवानी प्रवेशद्वार बनवण्याचा निश्चय केला.

येत्या रविवारी (ता. २० डिसेंबरला) हडसरच्या महादरवाजाचे पूजन करून दुर्गार्पण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी शिवजन्मभूमीतील दुर्ग व इतिहास प्रेमींनी, नागरिकांनी  उपस्थित राहावे असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान शिवजन्मभूमी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.