- गायत्री घोडकेपुणे - जीभ एखाद्याला लाखांतून उठवते, तर एखाद्याला लाखांत बसवते, असे म्हटले जाते. मात्र, याच जिभेने कसबा पेठेतील ७६ वर्षीय आजोबांना जागतिक स्तरावर नेऊन पोहोचवले आहे. तुझी नाकाला जीभ पोहचते का?.असे अनेकदा कोणी गमतीने म्हटले तरी आपण खरेच जीभ नाकापर्यंत पोहोचते का ते बघतो. पण फार काळ नाकाला जीभ लावून थांबणे तसे कठीणच आहे. परंतु या आजोबांनी चक्क नाकाला जीभ लावण्याचा अनोखा जागतिक विक्रम केला आहे. त्याची नोंद गिनेस वर्ल्ड रेकॉड्र्समध्येही नुकतीच झाली आहे.कसब्यातील शिंपी आळीतील सोपान ऊर्फ काका भूमकर या आजोबांनी तब्बल एक तास ३ मिनिटे ३९ सेकंद नाकाला जीभ लावून रेकॉर्ड केले आहे. भूमकर यांनी काही महिन्यांपूर्वी वृत्तपत्रात एका मुलीने २१ मिनिटे नाकाला जीभ लावल्याची बातमी वाचली..बातमी वाचल्यावर आजोबांनीही आपण हे करू शकतो, असा चंग बांधत पहिल्याच प्रयत्नात ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ जीभ नाकाला टेकवली. आजोबांनी पुन्हा आपण यापेक्षा अधिक वेळ करू शकतो हे तब्बल ९० मिनिटे नाकाला जीभ टेकवून दाखवून दिले. त्यांच्या या उपक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.मग याबाबतचे अधिक रेकॉर्ड्स आजोबांची नात मिहिका हिने तपासले असता, गिनीज बुकमध्ये ते ५२ मिनिटांचे असल्याचे समजले. मग आजोबांनी पुन्हा नवे रेकॉर्ड केले. या रेकॉर्डची गिनीज बुकमध्ये नोंद घेण्यात आली. आजोबांना रेकॉर्ड करत असताना नात मिहिका, मुलगा हर्षल व कुटुंबियांची मोलाची मदत होत आहे..अर्धांगवायूचे संकटभूमकर आजोबा दररोज व्यायाम करतात. त्यामुळे त्यांची तब्येत उत्तम आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर अर्धांगवायूचे संकट ओढावले होते. या संकटाशी दोन हात करत त्यांनी पुन्हा नव्या विक्रमाकडे कूच केली. त्यांनी एक तास ३ मिनिट ३९ सेकंद जीभ नाकाला लावत विक्रम केला. या विक्रमाची गिनेस बुकमध्ये नोंद झाली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.