पाटसकर कुटुंबाच्या जागेसाठी हिरवा झेंडा

नगर भूमापन क्रमांकात फेरबदलाची प्रक्रिया पूर्ण
Pataskar
Pataskarsakal
Updated on

दौंड/केडगाव : काँग्रेसचे दिवंगत आमदार व स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ पाटसकर यांच्या कुटुंबीयांनी मागितलेल्या जागेला चुकीचा नगर भूमापन क्रमांक पडला होता. या क्रमांकात फेरबदल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती दौंड तालुका भूमिअभिलेखचे अधीक्षक अमित ननावरे यांनी दिली.

जगन्नाथ पाटसकर यांनी दौंड एसटी स्टँड व ग्रामीण रुग्णालयासाठी त्यांची साडेसात एकर जमीन दिली होती. त्याबदल्यात सरकार त्यांना दौंडमध्ये घर बांधून देणार होते. मात्र, हा प्रश्न गेली ३० वर्ष रेंगाळला आहे. ‘सकाळ’ने या प्रश्नाला वाचा फोडल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. पाटसकर यांचे नातू सागर पाटसकर यांनी नगरमोरीजवळील नगर भूमापन क्रमांक २६६५ मधील १० गुंठे शासकीय जागा मागितली आहे. मात्र, प्रत्यक्षात या जागेला श्रीनिवास महसूल कर्मचारी गृहरचना संस्थेचा २६६४ क्रमांक पडला होता. सन १९९४ मध्ये झालेली ही चूक अद्याप तशीच होती.

Pataskar
श्रीगोंद्यातील कारखान्यांचे 16 लाख टन ऊस गाळप; नागवडे, कुकडी कारखान्यांना कमी क्षमतेच्या 'साजन शुगर'ची टक्कर

नगर भूमापन क्रमांकात फेरबदल करण्याचा अधिकार जिल्हा भूमी अधीक्षकांना असल्याने जागेची मोजणी करून त्यांना अहवाल पाठविण्यात आला. जिल्हा भूमी अधीक्षकांनी सुनावणी घेऊन फेरबदल करण्याचा आदेश नऊ ऑगस्टला दिला होता. ननावरे यांनी संबंधितांना नोटीस बजावून सुनावणी घेतली. श्रीनिवास संस्थेच्या हितास बाधा न आणता तांत्रिक दुरुस्ती करण्यास हरकत नसल्याचा मुद्दा संस्थेचे सभासद गोपाळ शिंदे यांनी मांडला. १७ व २१ ऑगस्टला या सुनावण्या झाल्या. २३ ऑगस्टला नगर भूमापन क्रमांकात फेरबदल केल्याचा अंतिम निर्णय देण्यात आला.

Pataskar
ऊस तोडणीसाठी सात कोयते पुरवितो म्हणत शेतकऱ्याला घातला चार लाखांचा गंडा 

तहसीलदार संजय पाटील यांना अहवाल पाठविण्यात आला आहे. अहवालात भूमी अभिलेखने म्हटले की, मागणी केलेल्या जागेत सागर पाटसकर यांचे नाव लावण्यात कोणतीही तांत्रिक अडचण नाही.

मिळकतपत्रिकेचे क्रमांक फेरबदलाचे प्रकरण वरवर पाहता छोटे दिसत असले; तरी जागेची मोजणी करणे, नकाशा बनविणे, वरिष्ठांना अहवाल पाठविणे, सुनावणी घेणे यासह खूप कागदपत्रांचा धांडोळा घ्यावा लागला. अल्पावधीत काम करण्यासाठी भूमी परिरक्षण कर्मचारी धर्मेंद्र खरात व श्रीकांत ताकभाते यांनी विशेष प्रयत्न केले.

- अमित ननावरे, अधीक्षक, दौंड तालुका भूमिअभिलेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.