Pune News : ‘नो पार्किंग’मधील वाहन उचलण्याबाबत मार्गदर्शक सूचना

परंतु ‘टोईंग चार्जेस’ घेऊ नयेत, अशा सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत
Mumbai
MumbaiSakal
Updated on

पुणे : वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करताना वाहनचालक आल्यास ते वाहन उचलू नये. वाहन चालकाकडून केवळ ‘नो पार्किंग’ शुल्क आकारण्यात येईल. परंतु ‘टोईंग चार्जेस’ घेऊ नयेत, अशा सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत.

Mumbai
Nashik Accident News : ट्रकने दुचाकीस्वार युवकाला चिरडले! पेठरोडवरील घटना

रस्त्यावर नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास दंडाच्या रकमेसह वाहन उचलण्याचे शुल्क लावले जाते. वाहने उचलणाऱ्या ‘टोईंग व्हॅन’वरील कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये बऱ्याचदा वाद होतात. कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी हुज्जत घातली जाते. याबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी सर्व ‘टोईंग व्हॅन’वरील कर्मचारी आणि संबंधित खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांना नागरिकांशी सौजन्याने वागण्याचा सल्ला दिला आहे.

टोईंग व्हॅन आणि क्रेनवर सहाय्यक फौजदार नेमावेत. ई-चलन मशिन आणि वॉकीटॉकी सोबत ठेवावी. वाहतूक पोलिसांनी उद्धट वर्तणूक करू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच, नागरिकांनीही पोलिसांचा सन्मान राखावा, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.