पुणे - कोंढवा परिसरातील एका बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना सोमवारी (ता. १६) दुपारी घडली. या हल्ल्यामागील कारण समजू शकले नाही. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दिलीप गायकवाड (वय ४३, रा. कोंढवा) असे जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी बबलू सय्यद, जगताप आणि भुसारी या तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.