हडपसर - पुणे शहरासह संपूर्ण राज्याचा राजकारण्यांनी विचका करून ठेवला आहे. जातीपातींमध्ये भांडणे लावून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवरून लक्ष विचलीत करण्याची व्यवस्था राजकारण्यांनी केली आहे..छत्रपतींनी निर्माण केलेले आणि आम्ही हरवलेले राज्याचे गतवैभव मला आणायचे आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. संधी वारंवार येत नाही. मनसे आणि राज ठाकरे पर्याय आहे. मला खुर्चीचा आणि सत्तेचा मोह नाही. मात्र, मी शब्द देतो, मी महाराष्ट्राचं भलं करील. असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले..महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हडपसर मतदारसंघातील उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. उमेदवार साईनाथ बाबर, अनिल शिदोरे, बाबु वागसकर, शिवाजी भाडळे, प्रतिक वाघे आदी यावेळी उपस्थित होते.राज ठाकरे म्हणाले, "नागरिकांना काय हवे याचा विचार न करता आपल्याला काय हवे, हेच लक्षात ठेवून हडपसरमधील राजकारण्यांनी येथील विकास खुंटवला आहे. आपले जुने गावच बरे होते, असे आज नगरिकांना वाटते. महापालिकेत ही गावी समाविष्ट का झाली असा सवाल विचारला जात आहे. हडपसरमध्ये रस्ते नाहीत. वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत..सामान्य नागरिकांना महिलांना मुलांना शाळेत पाठविण्यास भीती वाटते. महिलांना कायम धाकधूक वाटत असते. येथील राजकारण्यांनी केवळ जाती जातींमध्ये द्वेष पसरविला आहे. वातावरण चांगले दिवस आणणारे नक्कीच नाही. राज्यालाही हे वातावरण घातक आहे.'या परिसरात शाळांमध्ये सामान्यांना प्रवेश नाहीत, रुग्णालये नाहीत, महिलांना सुरक्षित वातावरण नाही, मुलींवर अत्याचार होत आहेत. मुंबईचा विचका होण्यास काही काळ गेला. मात्र, पुण्याचा विचका होण्यास वेळ लागला नाही..शहरांना आकार देताना लोकांचा विचार करणे गरजेचे आहे. सध्या विकासाच्या नावाखाली केवळ नव्या कंत्राटदारांना कामे देऊन त्यांच्याकडून केवळ टक्क्यांची वसुली केली जात असल्याचा घनाघात ठाकरे यांनी यावेळी केला.२०१४ मध्ये मनसेने राज्याचा विकास आराखडा तयार केला होता. यापूर्वी कोणत्याही पक्षाने एखाद्या राज्याचा विकास आराखडा तयार केला नव्हता. त्यामुळे माझ्या मनातील महाराष्ट्र घडवण्यासाठी एक हाती सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मला खुर्चीचा सोस नाही, मुख्यमंत्री माझ्या घरातील करावा, हा विचार देखील नाही. मात्र शिवछत्रपती यांनी दिलेले वैभव परत मिळवण्यासाठी मनसेला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.