हडपसर - एकीकडे लाडकी बहीण योजना राबवली जात असताना दुसरीकडे राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. गेल्या वर्षभरात राज्यात सुमारे ६७ हजार महिलांवर अत्याचार झाले. १३ हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही स्थिती राज्यासाठी चांगली नाही. त्यामुळे आता महिलांच्या हिताची जपणूक करणाऱ्यांना निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.