हडपसर : मृत्यूनंतर दुष्मनी संपली असे म्हटले जात असले तरी, नव्याने समाविष्ट गावातील नागरिकांना मयतचा दाखला मिळविण्यासाठी नरकयातनाच भोगाव्या लागत आहेत. महापालिकेच्या हडपसरमधील अण्णासाहेब मगर रुग्णालय सायंकाळी पाच वाजता बंद होते. त्यानंतर मृत्यूपास कोठे घ्यायचा असा संतप्त सवाल उंड्री-पिसोळी, होळकरवाडीतील नागरिकांनी उपस्थित केला.
मागिल सहा महिन्यांपूर्वी अकरा गावे महापालिकामध्ये समाविष्ट केल्याने ग्रामपंचायत कार्यालयातील कारभार महापालिकेकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर मयत पास मिळविण्यासाठी महापालिकेच्या हडपसरमधील मगरपट्टा चौकातील अण्णासाहेब मगर रुग्णालयाकडे धावाधाव करावी लागत आहे.
मगर रुग्णालय नव्या जागेत हलविले असून, ते ठिकाण शोधण्यात स्थानिकांची दमछाक होते आहे. त्यापुढे ते सायंकाळी पाच वाजता बंद होते. त्यामुळे दुःखमय स्थितीमध्ये नागरिकांनी आणखी किती यातना सहन करायच्या अशी पालिका प्रशासनाला नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.