अण्णासाहेब मगर महाविद्यालयात बुरशी संशोधनावर आंतरराष्ट्रीय वेबिनार

"ग्लोरी ऑफ फंगा' या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात बुरशी संशोधनावर आंतरराष्ट्रीय वेबिनार
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात बुरशी संशोधनावर आंतरराष्ट्रीय वेबिनारsakal
Updated on

हडपसर : येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त "ग्लोरी ऑफ फंगा' या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. वनस्पती व प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या वेबिनारमध्ये देश-विदेशातील सहा संशोधकांनी मार्गदर्शन केले. सहाशे पाच जणांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

कॅलिफोर्नियातील डॉ. शेषगिरी रघुकुमार, डॉ. विजयी कुमार गुप्ता, डेहराडून येथील डॉ. हर्ष एन. एस. के., लखनऊचे डॉ. संजीव नायका, हिमाचल प्रदेशचे डॉ. अजय गौतम, कलकत्ताचे डॉ. कृष्णेन्दू आचार्य, मुंबईचे डॉ. शशी रेखा सुरेश या संशोधकांनी बुरशी संशोधनाचा लेखाजोखा मांडून मार्गदर्शन केले.

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात बुरशी संशोधनावर आंतरराष्ट्रीय वेबिनार
पुणे : चिमुकल्या जीवाने १०० दिवसांनी जिंकली लढाई

विज्ञान विभाग समन्वयक डॉ. नेहा पाटील, आयक्युएस्सी समन्वयक डॉ. रमाकांत जोशी, प्रा. मनीषा जगदाळे, कार्यालय अधिक्षक धनंजय बागडे, श्रीमती वर्षा खळदकर, प्रयोगशाळा सहाय्यक संदीपान पवार, संजय पवार, नारायण खोमणे, राजेश राखुंडे, सचिन उरसळ आदी यावेळी उपस्थित होते.

वेबिनारचे समन्वयक व संशोधक डॉ. किरण रणदिवे म्हणाले, "बुरशीला जागतिक स्तरावर फंगी असे संबोधले जायचे. आता २०२१ पासून फंगा असे नामकरण करण्यात आले आहे. बुरशीच्या संशोधनाने वनस्पती व प्राणीशास्रातील अभ्यासाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. बुरशी संशोधनाला मोठे महत्व असून भविष्यात संधी निर्माण करण्याचे काम त्यातून निश्चतपणे होईल."

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात बुरशी संशोधनावर आंतरराष्ट्रीय वेबिनार
पिळदार मिशा असलेल्या त्यांनी केली सिंहगड घाटात सोळा किलोमीटरची पायपीट

प्राचार्य डॉ. पंडित शेळके म्हणाले, "बुरशीवरती अधिकाधिक संशोधन होणे अपेक्षित आहे. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी संशोधनामध्ये आपला सहभाग वाढवावा. विद्यार्थ्यांना त्यामध्ये करिअर करण्याची चांगली संधी आहे." उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिपावली शिरुरकर, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शरद गिरमकर, सहाय्यक समन्वयक डॉ. सुनीता दानाई-तांभाळे, डॉ. अंजू मुंडे, प्रा. रूपाली भावसार यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.