हडपसरला होणार पुण्यातले तिसरे रेल्वे स्थानक

पुणे शहराचे तिसरे रेल्वे स्टेशन ठरणारे आणि गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले हडपसर रेल्वे स्टेशनवरून आता स्वतंत्र वाहतूक सुरू होणार आहे.
Hadapsar Railway Station
Hadapsar Railway StationSakal
Updated on

पुणे - पुणे शहराचे (Pune City) तिसरे रेल्वे स्टेशन (Railway Station) ठरणारे आणि गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले हडपसर (Hadapsar) रेल्वे स्टेशनवरून आता स्वतंत्र वाहतूक (Transport) सुरू होणार आहे. या स्थानकावर ८ जुलै रोजी पहिली स्वतंत्र रेल्वे येणार असून ९ जुलै रोजी ती हैदराबादसाठी रवाना होईल. रेल्वेची वाहतूक होण्यासाठी या स्थानकावरील काम नुकतेच पूर्ण झाल्यामुळे या स्थानकावरून रेल्वे वाहतूक सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. (Hadapsar Third Railway Station in Pune)

शहरात पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशन आहे. मात्र, पुणे स्टेशनवरूनच स्वतंत्रपणे गाड्या सुटतात. पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर स्टेशनच्या आजूबाजूला निवासी लोकसंख्येची घनता जास्त आहे. जागेच्या अभावामुळे या स्थानकांच्या विस्तारीकरणाला मर्यादा आहेत. त्यामुळे पुणे स्टेशनला पर्याय म्हणून हडपसर रेल्वे स्थानक कार्यान्वित करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी हडपसर रेल्वे स्थानकाचे काम सुरू झाले. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

Hadapsar Railway Station
डीआरडीओची ‘ब्रिजिंग सिस्टिम’ सैन्यात दाखल

सोलापूरच्या दिशेने धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या या स्थानकावरून सोडण्याचे रेल्वेचे नियोजन आहे, असे रेल्वे प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रुंद प्लॅटफॉर्म, प्रतीक्षालय, आच्छादित प्लॅटफॉर्म, एक्सलेटर, सुसज्ज तिकीट व्यवस्था, खानपान सेवा, पोलिस, वाहनतळ आदी सुविधा या पुढील काळात टप्प्याटप्प्याने होतील. पीएमपी, रिक्षा आणि कॅबद्वारे प्रवासी हडपसरवरून पुण्यात येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे स्टेशनवर कोरोनापूर्व काळात २२० गाड्यांची रोज वाहतूक होत. तर सुमारे १ लाख ५० हजारांची ये-जा होत असे.

डब्यांची संख्या वाढणार

हडपसर स्थानकावर या पूर्वी १६ डब्यांच्या गाड्या थांबत होत्या. प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावर थांबत नव्हत्या. परंतु, आता २२ डब्यांची रेल्वेची वाहतूक येथून होऊ शकेल. तसेच पुढच्या वर्षापर्यंत २४ डब्यांची गाडीही येथून सुरू होऊ शकेल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

Hadapsar Railway Station
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास फुलांची आकर्षक सजावट

पहिली रेल्वे कोठून कोठे?

हैदराबादवरून ही गाडी (क्र. ०७०१४) ८ जुलैपासून दर सोमवार, गुरुवार, शनिवारी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि हडपसरला दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी पोचेल. हडपसरवरून ही गाडी (०७०१३) ९ जुलैपासून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी पोचेल. दौंड, कुर्डुवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जाहिराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेठ स्थानकांवर थांबेल.

हडपसर हे टर्मिनस म्हणून विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी वेगाने पावले टाकले पाहिजे. तसेच प्रवाशांना पुण्यात ये-जा करण्यासाठी पीएमपी, रिक्षा, कॅब यांची व्यवस्था केली पाहिजे. तसेच प्रवाशांसाठीच्या सुविधांचीही वाढ करणे गरजेचे आहे.’

- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.