NCPSP: हडपसरची जागा कुणाला जाणार? महाविकास आघाडीत गोंधळ! अंधारेंच्या वक्तव्यानंतर पुण्यात खळबळ

Sharad Pawar And Uddhav Thackeray: "पक्षाचे काम व संघटन कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर व खडकवासला या चारही मतदारसंघांमध्ये आहे."
Hadapsar Vidhan Sabha
Hadapsar Vidhan Sabha Esakal
Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी हडपसर विधानसभा मतदारसंघ आपल्याच पक्षाला मिळणार असल्याचा दावा केला. त्यावर मंगळवारी शहरात उलटसुलट चर्चा रंगली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अंधारे यांना विचारणा करण्यात येणार असल्याचे सांगत नाराजीचा सूर आळवण्यात आला.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सावध पवित्रा घेत अंधारे यांच्या वक्तव्याचे खापर माध्यमांवर फोडले.

महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची विधानसभेसाठी जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, अंधारे यांनी हडपसर विधानसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महाविकास आघाडीने सोडल्याचे सोमवारी जाहीर केले तसेच या मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाचीही घोषणा केली. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली.

या मतदारसंघातून गेल्या वेळी चेतन तुपे निवडून आले आहेत, ते नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेले. तरीही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाम आहे.

Hadapsar Vidhan Sabha
Bopdev Ghat Crime : पोलिसांना अद्याप धागेदोरे सापडेनात

पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी "महाविकास आघाडीची काल बैठक झाली, त्या बैठकीला सुषमा अंधारे नव्हत्या. अंतिम यादी येत नाही, तोपर्यंत आपण त्याविषयी बोलणार नाही. महाविकास आघाडीत समज-गैरसमज होईल, असे बोलणार नाही. मी एक जबाबदार खासदार आहे. अंधारे यांना फोन करून विचारणा करू,' असे स्पष्ट केले.

शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, "अंधारे यांना पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणून त्यांनी हडपसर मतदारसंघाबाबत केवळ दावा केला आहे. प्रत्यक्षात पक्षाचे काम व संघटन कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर व खडकवासला या चारही मतदारसंघांमध्ये आहे."

Hadapsar Vidhan Sabha
Baramati News : बारामतीत पवारांच्या भेटीगाठी वाढल्या - अजित पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.