Haldi Kumkum Ceremony : कासेवाडीत विधवा महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात

नवविवाहित महिलांच्या पुढाकाराने विधवा महिलांना हळदी कुंकू कार्यक्रम
Haldi Kumkum program of widow women in Kasewadi pune
Haldi Kumkum program of widow women in Kasewadi punesakal

महर्षी नगर - नवविवाहित महिलांच्या पुढाकाराने विधवा महिलांना हळदी कुंकू कार्यक्रमाला बोलावून त्यांचा सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम नेहा कांबळे व मोनिष कांबळे या नवविवाहित दाम्पत्याने आयोजित केला होता. या कार्यक्रमास महिलांना तीन चित्रफीत दाखवण्यात आल्या. या चित्रफीतमध्ये विधवा महिलांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलावण्यातून त्यांना आलेल्या अनुभवाच्या कथनाबाबत होत्या.

विद्या बाळ यांनी विधवा महिलांना स्त्रीच्या पलीकडे जाऊन तिचं माणूसपण मान्य करत तिचा सन्मान करण्याची दिलेल्या प्रतिक्रिया व तिला समाजात देण्यात येणारी अपमानात्मक दुय्यम वागणूक यावर केलेली सडकून टीका या चित्रफीत दाखवून उपस्थित महिलांना व्यक्त होण्यास सांगितले. यात अनेक महिलांनी ही वाईट वागणूक आहे आम्ही विधवा महिलांना अशी वागणूक देणार नाही असा निर्धार व्यक्त करत हळदी कुंकू लावून अनेक विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अलका गुजनाळ यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत याची प्रथम सुरुवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केल्याचे अधोरेखित केले. त्याचबरोबर त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांची तपशीलवार माहिती दिली. यामध्ये मातृवंदना योजना, बचत योजना, निराधार महिलांसाठीच्या योजना, लाडकी लेक योजना, स्वयंरोजगार योजना आदि योजनांबद्दल माहिती दिली.

त्याचबरोबर विधवा महिलांना हळदी कुंकू लावत कार्यक्रम संपन्न केला. या उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समूहसंघटिका अलका गुजनाळ व प्रमुख उपस्थिती म्हणून अभ्यासिका विद्यार्थी समितीचे अध्यक्ष ओंकार मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिष कांबळे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com