Handewadi Fire : हांडेवाडीत दोन गोदाम आणि एका गॅरेजला आग; कोणतीही जीवित हानी नाही

दोन गोदाम आणि एका गॅरेजला आग लागण्याची घटना हांडेवाडी येथील हांडे लॉन्सच्या मागे मंगळवारी घडली.
handewadi Godown Fire
handewadi Godown Firesakal
Updated on

उंड्री - दोन गोदाम आणि एका गॅरेजला आग लागण्याची घटना हांडेवाडी येथील हांडे लॉन्सच्या मागे मंगळवारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

येथील पुटयाचे, हार्डवेअरचे गोदाम आणि गॅरेजला चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. कागदाचे गोदाम असल्याने आग वाढतच होती. नागरिकांनी अग्निशामक दलाला फोन केल्यावर काळेपडळ, हडपसर, कोंढवा, कात्रज या ठिकाणावरील अग्निशामकदलाच्या मिळून एकूण आठ गाड्या त्वरित घटनास्थळी पोहचल्या.

आग आटोक्यात आणण्यासाठी एक तासाचा कालावधी लागला मात्र संपूर्ण आग थंड करण्याचे काम जवळपास तीन तास सुरु होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, असे काळेपडळ अग्निशामक दलाचे कर्मचारी सचिन आव्हाळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.