Hapus Mango : हापूस आंबा दोन हजार रुपये डझन

ऑक्टोबर महिन्यात लागलेल्या काही निवडक झाडांचे आंबे बाजारात दाखल होऊ लागले आहेत. हंगामपूर्व आंबे बाजारात येत असल्याने याला दर जास्त मिळत आहे.
Hapus Mango
Hapus MangoSakal
Updated on
Summary

ऑक्टोबर महिन्यात लागलेल्या काही निवडक झाडांचे आंबे बाजारात दाखल होऊ लागले आहेत. हंगामपूर्व आंबे बाजारात येत असल्याने याला दर जास्त मिळत आहे.

पुणे - ऑक्टोबर महिन्यात लागलेल्या काही निवडक झाडांचे आंबे बाजारात दाखल होऊ लागले आहेत. हंगामपूर्व आंबे बाजारात येत असल्याने याला दर जास्त मिळत आहे. हापूस आंब्याच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता असते. ही उत्सुकता आता काही प्रमाणात संपली आहे.

देवगडचा हापूस आणि केशर आंबा मार्केट यार्डातील फळबाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. सध्या अधूनमधून आंब्याची आवक सुरूच राहणार आहे, अशी माहिती व्यापारी सिद्धार्थ आणि सौरभ कुंजीर यांनी दिली. देवगडमधील कुणकेश्वर येथील शेतकरी मोहन वातकर यांच्या बागेतील आंबे बुधवारी शेखर तात्याबा कुंजीर अँड सन्स या गाळ्यावर विक्रीसाठी आले आहेत.

देवगड हापूसच्या दोन डझनाच्या पेटीला ८ हजार १०० रुपये दर मिळाला. या आंब्याची खरेदी व्यापारी युवराज काची यांनी केली, तर केशर आंब्याला प्रतिकिलोला ११०० रुपये दर मिळाला. या आंब्याची खरेदी व्यापारी रोहन जाधव यांनी केली. या वेळी राजू भोले, सलीम दस्तगीर, सागर केदारी, नितीन कुंजीर, हरेशकुमार द्वारकादास, शेतकरी मोहन वातकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.