पुणे - रिक्षातून घरी निघालेल्या एका तरुणीशी रिक्षाचालकाने अश्लील कृत्य केल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात मंगळवारी (ता. ५) रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.
या प्रकरणी एका २७ वर्षीय तरुणीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीच्या मैत्रिणीने नवीन दुचाकी खरेदी केली होती. त्यानिमित्त मैत्रिणीने एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती. पार्टी झाल्यानंतर ही तरुणी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधून बाहेर पडली.