कष्ट व अभ्यासाची तयारी असल्यास यश मिळते - शरद पवार

hard work Success SharadPawar
hard work Success SharadPawar sakal
Updated on

बारामती : पार्श्वभूमी नसेल मात्र कष्ट व अभ्यास करण्याची तयारी आणि कामासाठी जगाच्या पाठीवर कोठेही जायची तयारी असेल तर यश सहजतेने मिळते, असा कानमंत्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज युवा उदयोजकांना दिला. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर केलेल्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन अँग्रीकल्चर फेलोज यांच्या 21 दिवसीय प्रशिक्षण शिबीराचा समारोप आज बारामतीत झाला. त्या प्रसंगी आयोजित समारंभात पवार बोलत होते.

hard work Success SharadPawar
दहिवडीत सत्तांतर; प्रभाकर देशमुखांचा करिष्मा, आमदार गोरे गटाचा धुव्वा

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, एमकेसीएलचे प्रमुख विवेक सावंत, ज्येष्ठ उद्योगपती विजय शिर्के, अजय शिर्के, विठ्ठल मणीयार, भरतकुमार आहुजा, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, विश्वस्त सुनंदा पवार आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

कृषी, साहित्य व शिक्षण या तीन क्षेत्रात शरद पवार इन्स्पायर फेलोशिपची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. यातील कृषी क्षेत्रात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक मुलगा व एक मुलगी या नुसार 80 जणांची निवड करण्यात आली होती. या 80 जणांना उद्योजकीय मानसिकता तयार व्हावी व प्रोत्साहन मिळावे या साठी 21 दिवसांचे प्रशिक्षण बारामतीच्या इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटरमध्ये दिले गेले. त्याचा समारोप आज (ता. 19) झाला.

hard work Success SharadPawar
सातारा : 'काँग्रेस भाजपवर गुन्हे दाखल करणार'

शरद पवार म्हणाले, स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 35 कोटी लोकसंख्या 70 टक्के शेतीवर तर आज 115 कोटी लोकसंख्या 58 टक्के शेतीवर अवलंबून आहे, शेतीवरील भार वाढतोय, दुसरीक़डे विविध कारणांसाठी शेतजमिनी अधिग्रहीत होते आहे, त्या मुळे बोजा कमी करण्यासाठी वेगळ्या क्षेत्राकडे युवकांन वळावे लागणार आहे. त्या साठी असे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल.

या उपक्रमासाठी शासकीय स्तरावर सर्व मदत केली जाईल, तर आव्हानांना सामोरे जाताना तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा असे अजित पवार म्हणाले. अडचणींवर मात करता येते हे शरद पवार व छाब्रिया यांच्याकडे पाहिल्यावर समजते. नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून मूल्यवर्धित बाबी तयार केल्या तर नवीन काहीतरी करता येईल. आपल्या हृदयात काहीतरी करुन दाखविण्याची आग असेल तर अशक्य काहीही नाही, असे प्रतापराव पवार म्हणाले.

hard work Success SharadPawar
आंतरराज्य बससेवा बंदचा संकेश्वर आगाराला फटका

युवकांच्या कल्पना नाविन्यपूर्ण आहेत, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, या संकल्पनेतून अनेक नवीन संशोधन पुढे येईल व युवकांना काहीतरी करुन दाखविण्याची संधी मिळेल असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. जया तिवारी यांच्यासह टीमचे त्यांनी कौतुक केले. या प्रसंगी विवेक सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात या प्रशिक्षणाची पार्श्वभूमी व त्या संदर्भात संस्थेने केलेल्या कामांचा आढावा घेतला. उद्योजक घडविण्याचा हा प्रयत्न असून या उपक्रमातील एक युवक हजारो हातांना काम निर्माण करेल असे ते म्हणाले. अमित काळे, सोनाली सस्ते यांनी सूत्रसंचालन केले, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.