Pune : क्षारपड जमीन सुधारण्यासाठी ‘शारदा कार्बन प्लस’

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने ‘शारदा ऑरगॅनिक कार्बन प्लस’ हे विद्राव्य स्वरूपातील जिवाणू खत विकसित केले आहे
क्षारपड जमीन
क्षारपड जमीनsakal media
Updated on

पुणे : बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने ‘शारदा ऑरगॅनिक कार्बन प्लस’ हे विद्राव्य स्वरूपातील जिवाणू खत विकसित केले आहे. हे क्षारपड जमीन सुधारणा तसेच जमीन सुपीकता, पीक उत्पादन वाढीसाठी फायदेशीर दिसून आले आहे.

याबाबत कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे म्हणाले, की यामध्ये उपयुक्त जिवाणू आणि बुरशी आहेत. विशेषतः लॅक्टोबॅसिलस आणि सल्फर, पोटॅश, फॉस्फरस विरघळविणारे जिवाणूंचा समावेश आहे. कार्बन प्लसच्या वापरामुळे क्षारपड जमिनीची सुधारणा होते. मातीचे कण वेगवेगळे होतात. जमीन मऊ होते. वर्षातून दोन वेळा याचा वापर केल्याने जमिनीच्या वरच्या आणि खालच्या थरातील पाण्याचा निचरा सुधारतो.

जमिनीत मिसळल्यानंतर यातील जिवाणूंची संख्या वाढायला सुरुवात होते. जमिनीतील भौतिक आणि जैविक संरचना सुधारल्यामुळे पिकाला अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढू लागते. सेंद्रिय आम्ल जमिनीत तयार होते. त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते. विविध हंगामी पिके तसेच फळबाग, भाजीपाला पिकांच्या वाढीसाठी कार्बन प्लस उपयुक्त आहे.

"आम्ही नीरा, भीमा नदी क्षेत्र तसेच बारामती, इंदापूर तालुक्यातील क्षारपड जमीन तसेच सुपीकता कमी होत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये कार्बन प्लस वापराबाबत प्रात्यक्षिके घेतली. त्यामध्ये असे दिसून आले, की जमिनीची जैविक आणि भौतिक सुधारणा झाली. उसाची उगवण क्षमता सुधारली, फुटवे वाढले, कांडी वाढली, मुळ्यांची संख्या वाढली. पाणी निचरा चांगला झाला. सेंद्रिय कर्ब वाढला. पानांची हिरवटपणा वाढला. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही शारदा ऑरगॅनिक कार्बन प्लस हे ५,२०,३५ लिटरमध्ये उपलब्ध केले आहे. या संशोधनामध्ये श्री लोटस सोल्यूशनचे डॉ. अशोक कडलग, सचिन काळभोर आणि संतोष लाटणेकर यांचा समावेश आहे."

- डॉ. विवेक भोईटे, ७७२००८९१७७

‘शारदा ऑरगॅनिक कार्बन प्लस’चे फायदे

  • शिफारशीत रासायनिक खतांचा वापर १५ ते २० टक्यांनी कमी होतो. जमीन भुसभुशीत होते. सेंद्रिय कर्ब वाढतो. क्षारपड जमिनीत सुधारणा होते. जमिनीत हवा खेळती राहते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

  • जमीन तयार करताना एकरी १० टन शेणखत वापरले असेल किंवा पाचट कुजवून वापरले असेल तर एकरी २० लिटर कार्बन प्लस वापरावे अशी शिफारस आहे किंवा ५० टक्के शेणखत आणि ५० टक्के कार्बन प्लस वापरावे किंवा ५० टक्के मळी आणि ५० टक्के कार्बन प्लसचा वापर करावा.

  • कार्बन प्लस ठिबक सिंचनाच्या माध्यमातून वापरता येते. यामुळे ठिबक सिंचन यंत्रणेची स्वच्छतादेखील होते. जमिनीचे नुकसान होत नाही.

  • क्षारयुक्त जमिनीत वर्षातून दोन वेळा वापरावे. पावसाळ्याच्या अगोदर एकदा वापरल्याने जमिनीचा निचरा सुधारत जातो. जमीन चांगली असेल तरी देखील याचा वापर फायदेशीर ठरतो. फळबाग, भाजीपाला पिकांना वर्षातून चारवेळा वापरल्याने जमिनीचा पोत आणि सेंद्रिय कर्ब सुधारतो. पिकांना सर्व प्रकारची अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. फळे, भाजीपाल्याचा दर्जा वाढतो.

  • शेणखत, गांडूळ खत तसेच प्रेसमडची गुणवत्ता वाढविण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. एक टन शेणखत, गांडूळ खत किंवा प्रेसमडच्या ढिगावर ५ लिटर कार्बन प्लसची फवारणी करून ढीग योग्य पद्धतीने मिसळावा.आठ दिवस हे मिश्रण चांगले मुरवावे. यामुळे कुजण्याची प्रक्रिया लवकर होते. सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते.

  • जिवामृत, बायोगॅस स्लरीची गुणवत्ता वाढविण्यासाठी याचा वापर करावा. एकरी १००० लिटर जिवामृत किंवा बायोगॅस स्लरी वापरताना त्यामध्ये १ लिटर शारदा ऑरगॅनिक कार्बन प्लस मिसळावे.

  • फळबागांसाठी उपयुक्त

  • पीक अवस्थेनुसार वर्षातून चार वेळा एकरी ५ लिटर असे एकूण वर्षभरात २० लिटर वापरावे.

  • जमिनीत ओलावा असताना ठिबक सिंचनाच्या माध्यमातून २०० लिटर टाकीतून ५ लिटर कार्बन प्लस मिसळून पिकाला सोडावे.

  • पाट पाण्यामधून देखील वापरता येते. ड्रममध्ये पाणी घेऊन त्यात कार्बन प्लस मिसळून पाट पाण्याबरोबरीने सोडावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.