Loksabha Election 2024 : इंदापूर तालुक्यासह हर्षवर्धन पाटील यांचेही पालकत्व स्वीकारतो ; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मोदींना बळ देण्यासाठी महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचे केले आवाहन इंदापूर येथे भाजप कार्यकर्ता मेळावा संपन्न
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal
Updated on

हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षात आल्याने पक्ष मजबूत झाला असून फक्त तालुक्याच नाही तर हर्षवर्धन पाटील यांच्यासह इंदापूर तालुक्याचे पालकत्व स्वीकारण्यासाठी आलो आहे. आपल्या माध्यमातून मिळालेल्या शक्तीचा उपयोग हा इंदापूर तालुक्याबरोबरच हर्षवर्धन पाटील यांच्याकरता कसा करता येईल याकडे लक्ष देणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

इंदापूर येथे आयोजित भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी फडणवीस बोलत होते यावेळी माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील दौंडचे आमदार राहुल कुल, अंकिता पाटील राजवर्धन पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मोदींना राज्यातले मोठे नेते (शरद पवार यांचे नाव न घेता) शेती आणि उसाचे काय कळते असे म्हणायचे परंतु आता राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष असलेल्या हर्षवर्धन पाटील यांना विचारा आज शेती कारखानदारी जिवंत ठेवण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी नरेंद्र मोदी यांनी दिला म्हणून शेतकरी ताठ मानेने जगू शकतो. कारखाने टिकले असल्याचे सांगितले.

इंदापूर तालुक्यातील अडचणी संदर्भात सकारात्मक निर्णय कृतीतून झालेला दिसेल मुळशी धरणाचे पाणी इंदापूरला आणणे तसेच खडकवासल्यातील तीन टीएमसी पाणी दौंड आणि इंदापूरच्या भागासाठी देऊन सुजलाम सुफलाम करणे यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.

Loksabha Election 2024
Sangli Loksabha Constituency : ‘सांगलीत मैत्रीपूर्ण लढत नाही’ ;विशाल पाटील यांच्यासाठी राज्यसभेचा प्रस्ताव

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी वरिष्ठांनी माहिती करण्याचा निर्णय घेतला महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा तसा मित्र पक्षाने पाळायला पाहिजे.इंदापूर तालुक्यातील भ्रष्टाचाराच्या बाबतीत लक्ष घालावे मोदींच्या तसेच भाजपाच्या योजना खाली काम करीत असताना ठेकेदाराचा गोतावळा तालुक्यात निर्माण झाला आहे असाही आरोप यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी करीत तालुक्याचे पालकत्व घ्यावे आणि भविष्यात तालुक्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशीही मागणी केली. तर भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अंकिता पाटील म्हणाल्या, तालुक्यात आम्हाला खूप त्रास दिला जातोय खोट्या केसेस दाखल होत आहेत. सुसंस्कृत तालुका म्हणून ओळख असलेल्या इंदापूरला आता मात्र भ्रष्टाचाराचा ठेकेदाराचा तालुका म्हणून ओळखले जात आहे. मागील चार वेळा झालेला अन्याय पुन्हा होणार नाही अशीही मागणी केली.

हर्षवर्धन पाटील यांच्या कार्याचे कौतुक.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील हे वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत तसेच विधानसभेतही ते माझे आधी होते. संसदीय कार्यमंत्री असताना सर्वपक्षीय नेत्यांना सांभाळून घेणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं सर्वांना हर्षवर्धन पाटील म्हणजे हक्काची व्यक्ती वाटायची असे गौरव उद्गार हर्षवर्धन पाटील यांचे प्रती व्यक्त केले.

हर्षवर्धन पाटील महायुतीचे काम करणार..

बारामती लोकसभा मतदारसंघात आधी विधानसभेचे ठरवा मग लोकसभेचे पाहू अशी भूमिका घेणारे हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळाव्याच्या अखेरीस उभा राहून कार्यकर्त्यांना हात उंच करण्यास लावून महायुतीचे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील विजय शिवतारे यांच्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचीही भूमिका अजित पवार यांच्यासाठी पूरक ठरणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

लाकडी निंबोडी योजनेला निधी दिल्याबद्दल सत्कार..

या मेळाव्याच्या निमित्ताने भव्य दुचाकी रॅली काढीत प्रचंड शक्ती प्रदर्शन करण्यात आले तसेच सभास्थळा लगत असलेल्या स्वर्गीय शंकररावजी पाटील यांच्या पुतळ्यास देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. तर शहरातील पक्ष कार्यालयाचे सभास्थळावरून ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी इंदापूर तालुक्यातील बावीस गावांच्या जलसिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या लाकडी निंबोडी योजनेसाठी 228 कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.