Pune Vidahnsabha 2024: आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात इंदापूरच्या उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जो निर्णय घेतील. त्यांचा तो निर्णय मान्य असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मान्य केलेले आहे.
त्यामुळे इंदापूरच्या विधानसभेच्या उमेदवारीबाबतचा निर्णय आता फडणवीस घेणार आहेत आणि फडणवीस जो निर्णय घेतील. त्यांचा तो निर्णय मान्य असेल, असे स्पष्ट इंदापूर विधानसभेची जागा महायुतीच्या वाट्याला येणार असल्याचे भाजप नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (ता.१४) स्पष्ट केले. त्यांनी यावेळी या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत यावेळी दिले.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या बैठकीसाठी हर्षवर्धन पाटील हे आज पुण्यात आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना, त्यांनी हे संकेत दिले.
यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याने, बारामती विधानसभा मतदारसंघात आता तीन खासदार आणि दोन आमदार झाले आहेत. यामुळे या लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी फायदा होणार आहे.’’
उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा आता महायुतीतील एक घटक पक्ष झालेला आहे. मात्र सध्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रेय भरणे हे अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत.
त्यातच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे या मतदारसंघाचे माजी आमदार असल्याने, तेही पुन्हा एकदा या मतदारसंघातून आमदार होण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पिछेहाटीच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. यामागील कारणांचा शोध घेऊन, त्यांचे निराकरण केले जाणार आहे. यासाठी आतापर्यंत पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दोन ते तीन बैठका झालेल्या आहेत. येत्या चार-पाच दिवसात महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार आहे.
या बैठकीत या कारणांचा ऊहापोह करून, त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे भाजपची लोकसभा निवडणुकीत जरी पीछेहाट झाली असली तरी, त्याची येत्या विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होणार नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करेल, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.