निरगुडसर - रेशीम कोष खरेदी-विक्रीसाठी राज्यात उपलब्ध झालेल्या बाजारपेठ्यांमुळे रेशीम शेतीला सुगीचे दिवस आले आहेत. उपलब्ध झालेल्या बाजारपेठा मुळे शेतकऱ्यांना सरासरी ४०० रुपयांपासून ७०० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळू लागला आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यात ६०० ते ७०० एकरवर असलेली रेशीम शेती गेल्या चार वर्षात १२०० एकरच्या पुढे म्हणजे दुपटीने वाढली आहे.