पुणे - हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकीत जे-जे अंदाज दाखविण्यात आले होते ते सर्व अंदाज फेल ठरले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चमत्कार आणि त्यांच्या कामाची पोच पावती येथील जनतेने दिली आहे. तेथे देखील डबल इंजिनच सरकार होत आणि जनतेने त्यांना साथ दिली आहे. आत्ता राज्यात देखील हरियाणाची पुनरावृत्ती होणार असल्याचं विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.