Chakan MIDC: चाकणमधील 50 कंपन्या खरंच स्थलांतरित झाल्यात का? औद्योगिक विकास महामंडळाने केला खुलासा

Chakan MIDC migrated News: सदर बातमी चुकीची असून चाकण औद्योगिक क्षेत्रातील कोणतीही कंपनी गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात स्थलांतरीत झालेली नाही, असं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने म्हटलं आहे.
Chakan industrial estate of relocation due basic facility
Chakan industrial estate sakal
Updated on

Pune News: चाकण एमआयडीसीमधील ५० कंपन्या अन्यत्र स्थलांतरित झाल्याचे बातमी अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. याप्रकरणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने खुलासा केला आहे. चाकण एमआयडीसीतून ५० कंपन्या गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यामध्ये स्थलांतरीत झाले असल्याची बातमी प्रसिध्द झाली होती, सदर बातमी चुकीची असून चाकण औद्योगिक क्षेत्रातील कोणतीही कंपनी गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात स्थलांतरीत झालेली नाही, असं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने म्हटलं आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे टप्याटप्याने चाकण औदयोगिक क्षेत्र टप्पा क्र. १ ते ४ एकूण २७०० हेक्टर एवढे क्षेत्र विकसीत करण्यात आले असून औ‌द्योगिक क्षेत्रात एकूण १०९ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे जाळे उभारले आहे तसेच रस्त्यावरील दिवाबत्ती, उद्योजकांसाठी मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी ८० दश लक्ष लीटर प्रतीदिन क्षमतेचे पाणी पुरवठा केंद्र, अग्निशमन केंद्र, वाहनतळ इ. सुविधा पुरवल्या आहेत, असं औद्योगिक विकास महामंडळाने म्हटलं आहे.

Chakan industrial estate of relocation due basic facility
Tarapur MIDC Blast : तारापूर एमआयडीसीमधील कंपनीत भीषण स्फोट! पाच कामगार जखमी

जुन-२०२४ पासून सुरु झालेल्‍या पावसामुळे रस्‍त्‍यावर काही ठिकाणी खड्डे पडले होते. त्यानंतर रस्‍त्‍यावरील खड्डे भरुन रस्‍ते सुस्थितीत ठेवण्‍याचे काम महामंडळातर्फे करण्यात आले होते. चाकण औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्‍या विनंतीनुसार चाकण टप्‍पा क्र.२ व ४ मधील मुख्‍य रस्‍ता कॉक्रिटीकरणाचे काम हाती घेण्‍यात आले आहे, असं महामंडळाने सांगितलं आहे.

Chakan industrial estate of relocation due basic facility
Chakan MIDC बद्दल Supriya Sule यांच्या आरोपांवर Ajit Pawar यांचे सडेतोड उत्तर |

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव यांनी दावा केल्याप्रमाणे स्थलांतरीत झालेल्या ५० कंपन्याची यादी कळविण्याची त्यांना विनंती करण्यात आली होती. पण, सचिव फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांचेकडून माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे. तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या स्थलांतरीत झाल्याबाबत उद्योजकांकडून कोणतीही माहिती किंवा तक्रार महामंडळाकडे आजमितीस प्राप्त झालेली नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

महिंद्रा कंपनी गुजरात राज्यात स्थलांतरीत होत असल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी महांमंडळाने मे. महिंद्रा कंपनीस प्रत्यक्ष व ईमेलद्वारे विचारणा केली असता त्यांचेकडून चाकण येथील मे. महिंद्रा कंपनी गुजरात राज्यात स्थलांतरीत होत असल्याची बातमी चुकीची असून कंपनी स्थलांतरीत होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले, असं महामंडळाच्या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()