पुणे : ‘‘थोडीफार बचत शिल्लक होती, त्यावर पूर्वीच्या लॉकडाउनमध्ये सावरले. त्यानंतर कर्ज घेऊन पुन्हा व्यवसाय सुरू केला, तर पुन्हा नशिबात लॉकडाउन आला. साहेब दहा तारखेपर्यंत हप्ता भरायचा आहे. तो कसा भरणार, नाही भरला तर पुन्हा दंड पडणार, झोप येत नाही काय करावे, हा सवाल आहे. नितीन सुरेश गोरे या पाणीपुरी-भेळवाल्याचा.
कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने आजपासून ३० एप्रिलपर्यंत सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका हा पथारी, हातगाडीवाले यांना बसला आहे. त्यांचे हे उदाहरण. जंगली महाराज रस्त्यावर थोरात यांची पाणीपुरी-भेळीची गाडी आहे. मागील वर्षी झालेल्या लॉकडाउनमध्ये जी थोडीफार शिल्लक होती, त्या आधारे कसेबसे भागले. पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पथारी व्यावसायिकांसाठीच्या केंद्र सरकारच्या योजनेतून बँक ऑफ इंडियाकडून १० हजार रुपयांचे कर्ज घेतले. तसेच बाहेरून देखील दहा टक्के व्याजाने पैसे उचलले आहे. बँकेचा हप्ता दरमहिनाच्या दहा तारखेला भरावा लागतो. तो भरला नाही, तर दंड भरावा लागेल. बाहेरून कर्ज उचलले आहे, त्याचा हप्ता तर द्यावाच लागणार आहे. त्याच आता गाडीही बंद झाली. काय करावे, असा प्रश्न गोरे यांच्यासारख्या अनेक पथारी व्यावसायिकांपुढे उभा राहिला आहे.
हेही वाचा - पुणे विद्यापीठातील विशेष प्राध्यापकांची नियुक्ती रद्द करा; कुलगुरूंकडे मागणी
अशी आहे स्थिती
''महापालिकेने काढलेल्या आदेशात सायंकाळी सहा वाजेपर्यंत टपऱ्या सुरू ठेवण्यास आणि केवळ पार्सल देण्यास परवानगी दिली आहे. परंतु महापालिकेचे अतिक्रमण खाते आणि पोलिस टपऱ्या सुरु केल्या की कारवाई करीत आहेत. हे योग्य आहे का? पथारी व्यावसायिकांनी जगावे कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. पथारी व्यावसायिकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जावे, तर शासकीय कार्यालयात जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे त्यांना कोणीच वाली नाही का?''
- संजय शंके, कार्यवाह, जाणीव हातगाडी संघटना
हेही वाचा - आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची सोडत बुधवारी होणार जाहीर
''बिबवेवाडी येथे पापड, लोणचे आणि खाद्यपदार्थ विक्रीचा स्टॉल आहे. महापालिकेने काढलेल्या आदेशात खाद्यपदार्थाचे स्टूल सुरू ठेवण्यास परवानगी दिली असताना, मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी तो बंद करावयास लावला.''
- अण्णा पावसकर, खाद्यपदार्थ विक्रेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.