Waterfall in Chas: धरतीवरचा स्वर्ग म्हणजेच खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा..

Rain enhances the natural beauty of this scenic region: हिरवाईच्या गालीच्याबरोबरच कोसळणाऱ्या धबधब्यांनी खुलले खेडचे सौंदर्य..
Chas's waterfall
Chas's waterfallsakal
Updated on

Chas, Khed: 'शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी हर्ष निर्भर नटली अवनी' या वाक्याचा अनुभव येतो, धरतीवरचा स्वर्ग म्हणजेच खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा येथे. हा स्वर्ग खुलतो तो पावसाळ्यात... निसर्गाने संपन्न असलेल्या या पट्ट्यात पावसाने निसर्ग खुलला असून, नयनरम्य धबधबे, दुथडी भरुन वाहणारे भीमेचे पात्र, खळखळत वाहणारे ओढे- नाले व हिरवाईने नटलेला हा परिसर, स्वच्छ, सुरक्षित व निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी खेडच्या पश्चिम पट्ट्यात निसर्गप्रेमींसह पर्यटक गेल्या काही वर्षांपासून गर्दी करत असून, येथील स्थानिकांसह प्रामुख्याने आदिवासींना आपल्या व्यवसायाला चालना मिळत आहे.

सह्याद्रीच्या डोंगररांगांनी व्यापलेला खेड तालुक्याचा हा पट्टा म्हणजे निसर्गाचा अद्भुत खजिना आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी व्यापलेला हा परिसर म्हणजे शिरूर- भीमाशंकर राज्यमार्गाच्या एका बाजूस विस्तृत डोंगररांगा, तर दुसऱ्या बाजूस चासकमान धरणाचा विस्तृत पसरलेला जलाशय आहे. या भागात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात आवर्जून भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

Chas's waterfall
Katraj Crime : गुजर-निंबाळकरवाडी तलावात आढळला मतिमंद महिलेचा मृतदेह, भारती विद्यापीठ पोलिसांकडून तपास सुरु

धबधब्यांची मालिका

या भागातील डोंगररांगांमधून कोसळणारे धबधबे तरुणाईचे विलक्षण आकर्षण ठरत आहेत. या परिसरात पाऊस सुरूच असल्याने हे धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळत आहेत. या धबधब्यांखाली चिंब भिजण्यासाठी तरुणाई मोठी गर्दी करत आहे. वाडा गावच्या पुढे आव्हाट येथील उंच डोंगरावरून कोसळणारा धबधबा सुरू झाला की तेथून पुढे धबधब्यांची मालिका सुरू होते. शिरगाव-धुवोली येथील नयनरम्य नेकलेस धबधबा, मंदोशी घाटमाथ्यावरील धबधबा, टोकावडे कारकुडी रस्त्यावरील सुमारे दोनशे फूट दरीत कोसळणारा धबधबा व त्याच्या आसपास चिंब भिजण्यासाठी असलेले आकर्षक धबधबे, भिवेगाव येथील मनमोहक धबधबे यांसह भोरगिरी येथील चार ते पाच धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.

सुरक्षित पर्यटन

पुण्यापासून साधारण 80 चे 85 किलोमीटर व राजगुरूनगरपासून (ता. खेड) 40 ते 42 किलोमीटर अंतरावर असलेल्या या परिसरात जाण्यासाठी पक्क्या रस्त्यांचे जाळे असून, स्वतःच्या वाहनाने किंवा एसटी महामंडळ वा वडापची वाहने भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. खेडच्या पश्चिम पट्ट्यातील चास गावापासून हे पर्यटन सुरू होते. विशेष बाब म्हणजे राजगुरुनगर ते भोरगिरी या मार्गालगतच हे वैभव असून, रस्ता सोडून कोठेही जायची गरज भासत नाही. त्यामुळे सर्वात सुरक्षित हे पर्यटन आहे.

Chas's waterfall
ST News : आता एसटी दर सोमवार, शुक्रवारी साजरा करणार ‘प्रवासी राजा’ दिन

रोजगाराच्या संधी

पावसात चिंब भिजण्यामुळे गरमागरम चहा, चमचमीत कांदा भजी, वडापाव, मक्याची कणसे, भाजलेल्या शेंगा या सारख्या पदार्थांची हमखास गरज ओळखून येथील स्थानिकांसह प्रामुख्याने आदिवासींनी या पदार्थांच्या टपऱ्या, हॅाटेल उभारले आहेत. त्यामुळे रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत.

इतर आकर्षक ठिकाणे

पेशवेकालीन वैभव असलेले चास गाव म्हणजे थोरले बाजीराव पेशव्यांची सासुरवाडी आहे. पेशवेकालीन सोमेश्‍वर मंदिर व त्यापुढील भव्य पाषाणी दीपमाळ, भव्यदिव्य असे लक्ष्मीनारायणाचे सुवर्ण मंदिर आहे.

चासपासून पुढे आठ किलोमीटर अंतरावर चासकमान धरण, तेथून पुढे तीन किलोमीटर अंतरावर अहिल्यादेवी होळकरांनी जिर्णोद्धार केलेले डोंगरावर स्थित शंभो महादेवाचे जागृत देवस्थान आहे.

वाडा गावाच्या उत्तरेस डोंगर कपारीत असलेले गडदूदेवीचे सुंदर मंदिर व मंदिरावरील डोंगरावरून कोसळणारा नयनरम्य धबधबा आहे.

Chas's waterfall
Konkan Railway: कोकण रेल्वे सेवा रात्रीपासून ठप्प; 7 गाड्या रद्द, प्रवाशांचे प्रचंड हाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.