संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे उद्या पुण्यात आगमन; 'मनपा'कडून जय्यत तयारी, विश्रांतवाडीतही तयारी अंतिम टप्प्यात

वारकऱ्यांच्या सेवेकरिता ठिकठिकाणी सोसायट्या व अनेक सार्वजनिक मंडळांनी हिरहिरीने सहभाग घेतला आहे.
Pune Palkhi Sohala
Pune Palkhi Sohalaesakal
Updated on
Summary

महिला वारकऱ्यांसाठी ५०,००० सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. सदरील पालख्यांचा मुक्काम पालखी विठोबा मंदिर व निवडुंगा विठोबा मंदिर या ठिकाणी होणार आहे.

पुणे : सालाबादप्रमाणे याही वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj and Tukaram Maharaj Palkhi Sohala) यांच्या पालख्यांचे पुणे शहरात उद्या रविवारी (ता. ३०) आगमन होणार आहे. यावेळी दोन्ही पालखांच्या स्वागताच्या तयारीत संपूर्ण भवानी व नाना पेठेतील मंदिर परिसर सज्ज झाले आहे. ठिकठिकाणी विद्युत रोषणाई, मांडव, रंगरंगोटी, स्वच्छ्ता, रस्ते दुरुस्ती, पिण्याच्या पाणीचे टँकर, सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल टॉयलेट, औषध फवारणी, आरोग्य शिबिरे अशा प्रकारच्या आदी सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

यावेळी साखळपीर तालीम, श्रीमती सावित्री बाई फुले प्रशाला, रफी महंमद किडभाई शाळा, महाजनवाडी, तिलवंत तेली समाज, भिकुबाई मेनकुदळे, टिंबर मार्केट, मार्केट यार्ड, बाल जीवन शाळा, नवसेवक तरुण मंडळ अशा विविध ठिकाणी ओपन जागेत शेड टाकून वारकऱ्यांकरिता राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषत: यामध्ये वारकऱ्यांच्या सेवेकरिता ठिकठिकाणी सोसायट्या व अनेक सार्वजनिक मंडळांनी हिरहिरीने सहभाग घेतला आहे.

तसेच मनपाच्या (Pune Municipal Corporation) विविध विभागांच्या वतीने पालखी सोहळ्यामध्ये सहभागी वारकऱ्यांकरिता फिरत्या दवाखान्यांद्वारे मोफत आरोग्यसेवा पुरविली जाणार आहे. त्याचबरोबर पशु वैद्यकीय विभागामार्फत पुणे मनपा हद्दीतील भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे काम सुरू ठेवले आहे. भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत स्वच्छता विषयक कामकाज करण्यासाठी अंदाजे एकूण ३५० पुरुष सफाई सेवक व २५० महिला सफाई सेविका असे एकूण ६०० सफाई सेवक कार्यरत आहेत.

Pune Palkhi Sohala
महाजन आयोगावरील 'हा' धडा शाळेच्या अभ्यासक्रमात; वाद होण्याची शक्यता, कर्नाटक सरकारकडून चुकीची माहिती समाविष्ट

महिला वारकऱ्यांसाठी ५०,००० सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. सदरील पालख्यांचा मुक्काम पालखी विठोबा मंदिर व निवडुंगा विठोबा मंदिर या ठिकाणी होत असल्याने सदरील दोन्ही मंदिरांची अग्निशमन दलाकडून पाहणी करण्यात आली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील महात्मा गांधी रोडवरील बोर्डाने सर्वाधिक अतिक्रमण हद्दपार केले आहे. पेठांमधील व लष्कर भागातील पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात सज्ज झाली आहे.

Pune Palkhi Sohala
Pune Palkhi Sohalaesakal

डॉग स्क्वाडने दंडवत करून घेतले विठ्ठलाचे दर्शन

प्रशिक्षित असलेले डॉग स्क्वाड हे नागरिक व वारकऱ्यांच्या सुरक्षा सुरक्षितेसाठी सज्ज झाले आहे. यावेळी दोन्ही मंदिर व परिसराची पाहणी करत असताना 'राणा' या श्वानाने विठ्ठलाला दंडवत करून दर्शन घेत असल्याचे दृश्य हे अनेकांना आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

Pune Palkhi Sohala
Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीत विस्कळित पाणी पुरवठ्याचे विघ्न; वारकऱ्यांची होणार गैरसोय?

विश्रांतवाडी, कळस, येरवडा परिसरात पालखीच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात

विश्रांतवाडी : उद्या आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होत असून पालखीच्या स्वागतासाठी विश्रांतवाडी, कळस, येरवडा परिसर येथे जय्यत तयारी उत्साहात चालू आहे. येथील म्हस्के वस्तीत पुणे शहरात पालखी दाखल होते. पुणे महानगपालिकेतर्फे येथे जंगी स्वागत केले जाते. त्यासाठी करआकारणी केंद्राजवळ स्वागत कक्ष, वैद्यकीय कक्ष, हिरकणी कक्ष व वारकर्‍यांसाठी विसावा कक्ष उभारण्यात आला आहे. दत्तमंदिर, पोलीस लाईन, शांतीनगर व डेक्कन कॉलेज येथे विसावा कक्ष उभारण्यात आला आहे.

पाच ठिकाणी वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले आहेत. सगळीकडची स्वच्छता करण्यात आली आहे. 90 टक्के तयारी झाली असून अजून तयारी चालू असल्याचे येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त चंद्रसेन नागटिळक यांनी सांगितले. परिसरात विविध सामाजिक व सार्वजनिक संस्था, संघटना, मंडळे व राजकीय नेत्यांतर्फे पालखीचे स्वागत केले जाते. यासाठी ठिकठिकाणी मंडप उभारले जात आहेत. विविध संस्था-संघटनांतर्फे वारकर्‍यांना अन्नवाटप, फळवाटप, पाणीवाटप केले जाते. त्याचबरोबर विविध संस्थांतर्फे वारकर्‍यांचे आरोग्य तपासणी शिबिर घेतले जाते. दरवर्षी अष्टविनायक मंडळातर्फे वारकर्‍यांच्या पायांना मसाज सेवा दिली जाते. तसेच चर्मकार संघटनेतर्फे चप्पल दुरुस्ती सेवा मोफत दिली जाते. या सगळ्यांची तयारी चालू आहे.

Pune Palkhi Sohala
Pune Palkhi Sohalaesakal

येरवडा डॉक्टर्स असोसिएशन, केदारनाथ हॉस्पिटल व चंद्रकांत जंजिरे प्रतिष्ठानतर्फे फराळ वाटप, औषध वाटप व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. त्याची तयारी चालू आहे. काँग्रेसतर्फे पाणी वाटप व आरोग्य तपासणी शिबिर घेण्याची तयारी चालू असून मंडप उभारला असून इतर तयारी चालू असल्याचे राजू ठोंबरे यांनी सांगितले. सतीश म्हस्के, अनिल टिंगरे, चंद्रकांत व रेखा टिंगरे, ट्रकचालक संघटना यांच्यातर्फे स्वागतासाठी मंडप उभारले आहेत. परिसरात सगळीकडे वारकर्‍यांच्या व पालखीच्या स्वागताचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. पोलिसांनी बंदोबस्तासाठी खास नियोजन केले असून सुमारे साडेतीनशे पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत. यासाठी लोणीकंद, मुंढवा, कोंढवा, येरवडा, विश्रांतवाडी अशा विविध पोलीस ठाण्यांतून पोलीस फौज मागवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.