Pune News: खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून दिवसभरात विसर्गामध्ये टप्प्याटप्याने वाढ करण्यात आली.
पावसामुळे या चारही धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली. पर्यायाने पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तीन धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. या तीन धरणांतून सोडलेले पाणी खडकवासला धरणात जमा होते. तसेच पाऊस पडताच ओढे-नाले वेगाने वाहू लागले. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. दिवसभरात खडकवासला धरणात 40, पानशेत- 116, वरसगाव-112 आणि टेमघर धरणात 150 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात पाण्याचा येव्यात मोठी वाढ झाली.