Bhor : तालुक्यातील सह्याद्री डोंगरांच्या घाटमाथ्यावर वादळी वा-यासह मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. झाडे उन्मळून पडणे, वीजेचे खांब कोसळणे, वादळी वा-यामुळे घरांचे छप्पर उडणे, भिंती पडणे, दरडी कोसळणे आणि वाहतूक बंद होणे असे प्रकार घ़डत आहेत.
त्यामुळे तालुका प्रशासनाकडून नागरिकांना सावधगीरी बाळगण्याचे आवाहन केले असून आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचा-यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील भाटघर धरण आणि नीरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे.
मागील चोवी तासात भाटघर धरणाच्या कुरुंजी येथे आणि निरा-देवघरच्या धरणाच्या नीरा नदीचे उगमस्थान असलेल्या शिरगाव येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी (ता.२५) सकाळी सात वाजता कुरुंजी येथे २४८ मिलीमीटर आणि भूतोंडे येथे २४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तर शिरगाव येथे गुरुवारी पहाटे २ वाजता १५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पांगारी येथे गुरुवारी पहाटे ५ वाजेपर्यंत १६४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. नीरा-देवघर धरणाच्या साईटवर ९५ मीलीमीटर तर भाटघर धरणाच्या साईटवर ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
भोर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि घाटातील गावांमधील शेतक-यांनी शेतातील कामे करताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले असून शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षासह सर्व शासकीय कर्मचा-यांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.
नैसर्गीक आपत्ती व अपघात प्रसंगी तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष (फोन नंबर ०२११३- २२२५३९), पोलिस ठाणे ( फोन नंबर ०२११३-२२२५३३) आदींसोबत गाव कामगार तलाठी आणि मंडलाधिकारी कार्यालयांशी त्वरीत संपर्क साधावा असेही तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.
यावर्षी गुरुवारी (ता.२५ जुलै) सकाळी तालुक्यात झालेल्या सर्वाधिक पावसाची नोंद पुढीलप्रमाणे
गाव -मोजण्याची वेळ(गुरुवारी) - मागील २४ तासांमधील पाऊस - एकूण पाऊस
भूतोंडे -७ वाजता -२४३- २४७३
शिरगाव- १.४५ वाजता -१५४- २४७८
कुरुंजी -७ वाजता -२४८- २१४०
पांगारी- ५ वाजता -१६४ -२००५
शिरवली हिमा - ५.१५ वाजता- १०८- १८२८
हिर्डोशी- ४ वाजता -२०६ -१९९१
नीरा-देवघर धरण -५ वाजता -९५- १०२१
आंबेघर- ६.३० वाजता -१२२ -७८८
भाटघर धरण- ५.१५ वाजता -३५ -४७७
घीसर - बुधवारी (दु ३ वाजता) - नोंद नाही - २०७५
वेल्हे- ७ वाजता -१४९- १३०२
भट्टी वाघदरा- ५ वाजता- १७४ -१९६३
गुंजवणी धरण -७ वाजता- १५१ -२४७४
भाटघर - ६७.०४ टक्के
नीरा-देवघर - ६०.०७ टक्के
गुंजवणी - ७१.०१ टक्के
वीर - ८५.५५ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.