मुळशी तालुक्यात गुरुवार रात्री पासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ओढे, नद्यांना पुन्हा पूर आला आहे.
भुकूम - मुळशी तालुक्यात गुरुवार रात्री पासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ओढे, नद्यांना पुन्हा पूर आला आहे. भात पिकासाठी पावसाची उघडीप गरजेची आहे.
तालुक्यात गेली आठ दिवसा पासुन सुर्य दर्शन नाही. विजेच्या गडगडाटासह पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान गुरवारी रात्री पासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुळशी धरणातून मुळा नदीत सकाळी पंधरा हजार क्यूसेसने पाणी सोडण्यात आले होते. दरम्यान दुपारीही जोरदार पाऊस पडल्यामुळे सांकाळी 26 हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे.
तसेच पाऊस कायम राहिल्यास रात्री 30 ते 35 हजार क्यूसेस पाणी सोडावे लागेल, त्यामुळे नदी काठच्या ग्रामस्थांना सावधनतेचा इशारा तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिला आहे. त्यामुळे नदीस पुन्हा पूर आला आहे. नदी तासाबाहेर वाहत आहे. मुठा नदीही दुथडी भरून वाहू लागली. तालुक्यातील रिहेजवळ खोरे, मुळा खोरे, कोळवण खोरे, धरणभागातील ओढ्यांना पूर आला आहे. शुक्रवारी सकाळ पासून पावसाची जोर कायम राहिला आहे. भात पिकासाठी पाऊस उघडण्याची प्रतिक्षा शेतकरी करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.