Rajgad Rain : राजगड तालुक्यात मुसळधार पाऊस

दुर्गम पासली खोऱ्यामध्ये दोन दिवसात 130 मिलिमीटर पावसाची नोंद
rain
Rainesakal
Updated on

वेल्हे : राजगड तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर अधिक असल्याने दुर्गम पासली खोऱ्यामध्ये दोन दिवसात 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे .पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे व घरे विद्युत खांब पडल्याच्या घटना समोर आल्या आहे. याबाबत प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले असून चोवीस तास आपत्कालीन संपर्क केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.

rain
Nashik Crime News : 10 हजारांसाठी दिले कोयत्याने ठार मारण्याची धमकी!

राजगड तालुक्यामध्ये सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून तालुक्याच्या पानशेत, वरसगाव, राजगड ,तोरणा, गुंजवणी धरण परिसरामध्ये पाऊस अधिक प्रमाणात पडत असल्याने डोंगर कडे ,धबधबे ,ओढे, नाले ,दुथडी भरून वाहू लागले आहेत. तालुक्यातील अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याची व घरांचे नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या खानू येथील डिघे वस्तीत जोरदार वादळी पावसाने बबन रामचंद्र कोकरे यांचे घर जमीन दोस्त झाले आहे. मात्र सुदैवाने येथे जीवित हानी झाली नाही .या ठिकाणी पानशेत मंडलाधिकारी प्रशांत ओहोळ यांच्यासह तलाठी सुरेश किरवले यांनी पंचनामा केला आहे तर

rain
Nashik Abduction News : युवतीचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न! देवळाली कॅम्पातील घटना

हारपुड येथील पांडुरंग दगडू कुमकर यांचे अतिवृष्टीमुळे घर कोसळले असून ग्रामसेवक रामदास क्षीरसागर व तलाठी राजेश गाडे या ठिकाणी जाऊन पंचनामा केला आहे. याच गावातील विजेच्या पोलवरील कनेक्शन तुटले असून ट्रान्सफॉर्मर डीपी पावसाने वाकली असल्याने सदर गावाचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी छोटी मोठी झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत यामध्ये आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वेल्हे नसरापूर मार्गावरील विंझर गावच्या हद्दीत भले मोठे झाड पडल्याने येथील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जेसीबीच्या साह्याने हे झाड बाजूला करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे.

याबाबत वेल्ह्याचे तहसीलदार निवास ढाणे म्हणाले, तालुक्यामध्ये जोरदार पडणाऱ्या पाऊस व वादळी वाऱ्या ंमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत याबाबत प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच तालुक्यात महसूल विभागाच्या माध्यमातून 24 तास आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी आपत्कालीन नंबर वर संपर्क करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.