Pune News : अतिवृष्टीची परिस्थिती पाहून शाळांना देणार सुटी - शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविली आहे.
Pune Rain News
Pune Rain Newsesakal
Updated on

पुणे - राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीचा इशारा असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमांच्या, मंडळाच्या शाळांना आवश्यकतेप्रमाणे सुटी घोषित करण्यात यावी, अशी सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढला असून हवामानशास्त्र विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये धोक्याचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. त्यामुळे शिक्षण संचालनालयाने खबरदारी घेतली आहे. अतिवृष्टीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळांना आवश्यकतेनुसार सुटी घोषित करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना मांढरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलली

‘राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार गुरुवारी (ता.२०) होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. दहावीचे पुढे ढकलण्यात आलेले पेपर २ ऑगस्ट रोजी, तर बारावीचे पेपर ११ ऑगस्ट रोजी होतील,’

- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

पुण्यातील शाळा सुरू राहणार

पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका असला तरी, सध्या शहर व जिल्ह्यातील शाळांना सुटी देण्याची गरज वाटत नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. तसेच पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने देखील अद्याप पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुटी जाहीर केलेली नाही. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा गुरुवारी (ता. २०) नियमितपणे सुरू राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.