Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाला सुरूवात; राज्यात सतर्कतेचा इशारा; हायअलर्ट जारी, हवामान खात्याचा अंदाज

Weather Update Maharashtra: राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज(शुक्रवारी) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पुणे शहर परिसरा पावसाने हजेकी लावली आहे.
Pune Rain Update
Pune Rain Updatesakal
Updated on

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज(शुक्रवारी) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पुणे शहर परिसरा पावसाने हजेकी लावली आहे. सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर आज हवामान विभागाकडून नंदुरबार वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. आज हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे आजपासून (शनिवार) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची कामे तातडीने आटोपून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

Pune Rain Update
सोलापूरचा गाजलेला खटला! अवघ्या 63 दिवसांतच मिळाला अल्पवयीन पीडितेला न्याय; सर्वांत जलद चाललेला खटला म्हणून नोंद

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे आजपासून (शुक्रवारी) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची कामे तातडीने आटोपून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काल (गुरुवारी ता. ६ जून) मान्सूनचं आगमन झालं आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळी अचानक आलेल्या पावसामुळे पुणे शहर परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली .

Pune Rain Update
Devendra Fadnavis : संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर फडणवीस दिल्लीत ; शहांची भेट घेऊन होणार अंतिम निर्णय

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३ दिवसांत मान्सून मुंबईसह विदर्भ तसेच मराठवाड्यात धडक देईल. त्यामुळे शनिवारपासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात मान्सून दाखल झाला असून हवामान खात्याकडून पुढील 5 दिवसांसाठी जिल्हास्तरीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत मान्सूनचं आगमन झालं आहे.

Pune Rain Update
Maharashtra Monsoon : सुखसरींचा वर्षाव! ; मॉन्सून राज्यात दाखल,सोलापूरपर्यंत मजल

आज कोणत्या भागात पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजनुसार, आज मुंबई, पुणे, ठाणे, पालघर तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावासह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव तसेच इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील. विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

Pune Rain Update
Police Patil : पोलिस पाटलांचे वाढीव मानधन कागदावरच ; घोषणा होऊन अडीच महिन्यांनंतरही नाही अंमलबजावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.