पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील गावांता आज रविवारी सायंकाळी गारांसह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पूर्वभागातील अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी, धामणी, लोणी, वाळुंजनगर, रानमळा, लाखणगाव, काठापुर बुद्रुक,
मांदळेवाडी, वडगापीर, शीरदाळे परिसरात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जोरदार गारा पडायला लागल्या त्याच बरोबर मुसळधार पाऊस झाला लोणी, पोंदेवाडी, शिरदाळे व धामणीत मुसळधार पावसाने शेतातील ज्वारी,
तसेच इतर पिके भुईसपाट झाली वडगावपीर, मांदळेवाडी, खडकवाडी व वाळुंजनगर या परिसरात गारपीटीने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले खडकवाडी येथील संतोष रामभाऊ सुक्रे यांच्या शेतात बटाटा काढणी सुरू असताना जोरदार गारा पडल्याने शेतातील सरीतील काढलेले बटाटे फुटले तसेच त्यांच्या शेतातील कांद्याची रोपे भुईसपाट झाली.
वाळुंजनगर परिसरातही गारांचा खच साचला होता.शेतातील मेथी, कोथिंबीर पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याचे जयेश वाळुंज यांनी सांगितले, लोणी बाजार समितीच्या उपबाजार आवारात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कांदा सोसाट्याच्या वाऱ्यासह झाल्याने पावसाने भिजल्याने मोठे नुकसान झाल्याचे कांद्याचे व्यापारी महेंद्र वाळुंज व नितीन नरवडे यांनी सांगितले.
शासनाने या परिसरात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून संबंधितांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वाळुंजनगर च्या सरपंच तृप्ती महेंद्र वाळुंज, पोंदेवाडीच्या सरपंच नीलम अनिल वाळुंज,
मांदळेवाडीच्या सरपंच उज्वला अतुल आदक, धामणीच्या सरपंच रेश्मा अजित बोऱ्हाडे, वडगावपीर च्या सरपंच मीरा संजय पोखरकर, खडकवाडीच्या सरपंच कमल सुभाष सुक्रे तसेच अनिल डोके, ऊर्मिला धुमाळ, अशोक आदक पाटील, सागर जाधव, पिंटू पडवळ, गोरक्ष पोखरकर,बाबु आदक यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.