पुणे : राज्यात कोकणात मॉन्सून दाखल झाल्याचं आज (शनिवार) हवामान खात्यानं जाहीर केलं. पण अद्याप महाराष्ट्राभर मॉन्सून दाखल होण्यासाठी पुढील दोन दिवस लागतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण पुणे शहरात आज पावसानं दमदार हजेरी लावली. हा मॉन्सूनपूर्व पाऊस असल्याचं सांगण्यात येत असलं तरी मॉन्सूनच्या पावसाप्रमाणं शहरभर धुवांधार ते संततधार पाऊस कोसळत आहे. (Heavy rains in Pune Heavy to moderate continues throughout the city)
शहरातील रामटेकडी, वैदुवाडी, हडपसर, नगर रस्ता भागात वाघोलीपर्यंत गेल्या दोन तासांपासून तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणचा विद्युत पुरवठाही खंडीत झाला आहे. त्याचबरोबर बाणेर, बालेवाडी, औंध परिसरातही अद्याप पाऊस सुरु आहे.
शहरासह उपनगरात रात्री उशिरा जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. तर दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. पुढील दोन दिवस शहरात आकाश ढगाळ आणि दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुढील २४ तास मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण असल्याने रविवारी पुण्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.