Monsoon Mission : मॉन्सून मिशनसाठी जगभरातून मदत घेणार - किरण रिजीजू

जागतिक हवामान बदलावरील संशोधनात भारताने आघाडी घेतली आहे. देशाच्या ‘मॉन्सून मिशन’च्या माध्यमातून अधिक प्रभावी आणि अचूक हवामान अंदाजासाठी प्रयत्न केले जात आहे.
Kiren Rijiju
Kiren Rijiju sakal
Updated on

पुणे - जागतिक हवामान बदलावरील संशोधनात भारताने आघाडी घेतली आहे. देशाच्या ‘मॉन्सून मिशन’च्या माध्यमातून अधिक प्रभावी आणि अचूक हवामान अंदाजासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी जगभरातून आवश्यक ती सर्व मदत घेतली जाईल, अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरण रिजीजू यांनी सांगितले.

पाषाण रस्ता येथील भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेला (आयआयटीएम) रिजीजू यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. व्यासपीठावर आयआयटीएमचे संचालक डॉ. आर. कृष्णन, मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, भारतीय हवामानशास्त्र संस्थेचे प्रमुख डॉ. के.एस होसाळीकर आदी उपस्थित होते.

हवामान बदलामुळे मॉन्सूनच्या वर्तनात मोठा बदल होत आहे. कृषिप्रधान भारतासाठी मॉन्सूनचा अचूक अंदाज महत्त्वपूर्ण असून त्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. म्हणून मिशन मॉन्सूनच्या माध्यमातून यासंदर्भात मोठे संशोधन करण्यात येत आहे.

मोहिमेच्या सद्य स्थितीबद्दल सांगताना रिजीजू म्हणाले, ‘भारतासारख्या वेगवान अर्थव्यवस्थेसाठी हवामान बदलाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवासह हिमालयात हवामान संशोधन केंद्र असून, भविष्यात हिमालयीन क्षेत्रात संशोधन वाढविण्यावर भर देणार आहे.’

महासंगणकाची क्षमता वाढणार

आयआयटीएमकडे असलेल्या प्रत्युश सुपरकॉम्प्युटरची क्षमता वाढविण्यात येणार आहे. सध्या ४ पेटाफ्लॉप क्षमतेचा असलेली क्षमता आता वाढवून १० पेटाफ्लॉप करण्यात येणार आहे. ज्यामुळे हवामान संबंधी संशोधनाचा वेग वाढेल.

‘आर्क्टिक’ केंद्राला चालना

उत्तर ध्रुवावरील ‘आर्क्टिक’ भागातील भारताच्या संशोधन केंद्राला येत्या काळात चालना देण्यात येणार आहे. हवामानाबरोबरच अवकाश संशोधन आणि खगोलशास्त्रीय संशोधनाला चालना दिली जाणार आहे. निरीक्षण उपकरणांसह नव्या दुर्बिणीही उभारण्यात येतील, अशी माहिती सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी दिली. भविष्यात संशोधनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याचा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.