मासिक पाळी दरम्यान ‘ती’ची ‘बीएफपी’ला पसंती

मासिक पाळी दरम्यान वापरण्यात येणारे सॅनिटरी पॅड एकदा वापरल्यानंतर टाकले जातात. त्यामुळे अशा कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे.
Menstruation
MenstruationSakal
Updated on

पुणे - मासिक पाळी (Menstruation) दरम्यान वापरण्यात येणारे सॅनिटरी पॅड (Sanitary Pad) एकदा वापरल्यानंतर टाकले जातात. त्यामुळे अशा कचऱ्याचे (Garbage) प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत ‘बनाना फायबर बेस्ड सॅनिटरी पॅड’ (बीएफपी) (BFP) हे सामान्य सॅनिटरी पॅडच्या तुलनेत पुनर्वापरायोग्य, पर्यावरणपूरक असल्याची बाब नुकतीच एका अभ्यासातून स्पष्ट झाली आहे. या पॅडला अनेक महिलांनी पसंती दिली आहे. (Her Preference for BFP during Menstruation)

केळीच्या फायबरने तयार करण्यात आलेले पॅड सुरक्षित व वापरण्यायोग्य आहे की नाही तसेच त्याचा पर्यावरणावर काही परिणाम होतो का, याचा अभ्यास केरळ येथील अमृता विश्व विद्यापीठाच्या वतीने करण्यात आला. यासाठी महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू येथील १० ते ४५ वयोगटातील महिलांनी याचा वापर करत आपले अनुभव सांगितले. अभ्यासाबाबतची माहिती नुकतीच ‘बीएमसी वूमन्स हेल्थ’मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. कृष्णश्री अचूथन, अंजू बीष्ट, शरण्या मुथुपलानी आदींनी सहभाग घेतला होता.

Menstruation
जगावं की मरावं ? सनईच्या सूरांची कळी कोमेजली

‘मासिक पाळीसाठी सॅनिटरी पॅडचा वापर इतर वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न होणाऱ्या मासिक पाळीच्या कचऱ्याचे विल्हेवाट लावणे आव्हानात्मक ठरत आहे. तर अनेक महिलांना मासिक पाळी व त्याच्याशी संबंधित आजार उद्भवतात. अशात सुरक्षित, पुनर्वापर केला जाणारा आणि सहज उपलब्ध होणारा पर्याय म्हणून ‘बीएफपी’चा वापर केला जाऊ शकतो,’’असे अंजू बीष्ट यांनी सांगितले.

निष्कर्ष

  • सामान्य ‘सॅनिटरी पॅड’च्या तुलनेत ‘बीएफपी’च्या वापरामुळे डाग पडण्याचे प्रमाण कमी

  • तीन वर्षे पुनर्वापर केलेल्या ‘बीएफपी’वरील सूक्ष्मजीव भार (मायक्रोबियल लोड) हा न वापरलेल्या ‘बीएफपी’ सारखाच आढळला

  • सामान्य पॅडमुळे पर्यावरणात ०.४१ किलोग्राम कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जन. ‘बीएफपी’मुळे ०.०१ किलोपेक्षा कमी उत्सर्जन

  • शहरी भागात ७१.६ टक्के, तर ग्रामीण भागातील ८७.५ टक्के महिलांकडून चार महिन्यांपेक्षा जास्त काळ ‘बीएफपी’चा वापर

  • मोठी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनेच्या (एमएचएम) गरजा पूर्ण करण्यासाठीचा उत्तम पर्याय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()