पुणे विद्यापीठातील हेरिटेज वॉक झाला समृद्ध

अठराव्या शतकातील दुर्मिळ चित्रे, इंग्रजकालीन मुख्य इमारत, तीला जोडूनच असलेले भुयार, विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि इंग्रजांच्या वास्तूकलेच्या इतिहासाने नागरिकांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भेट अधिक समृद्ध ठरली.
Pune University
Pune UniversitySakal
Updated on
Summary

अठराव्या शतकातील दुर्मिळ चित्रे, इंग्रजकालीन मुख्य इमारत, तीला जोडूनच असलेले भुयार, विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि इंग्रजांच्या वास्तूकलेच्या इतिहासाने नागरिकांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भेट अधिक समृद्ध ठरली.

पुणे - अठराव्या शतकातील दुर्मिळ चित्रे, इंग्रजकालीन मुख्य इमारत, तीला जोडूनच असलेले भुयार, विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि इंग्रजांच्या वास्तूकलेच्या इतिहासाने नागरिकांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune University) भेट अधिक समृद्ध (Enrich) ठरली. निमित्त होते विद्यापीठातील हेरिटेज वॉकचे. (Heritage Walk) लॉकडाउननंतर प्रथमच सुरु केलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाला नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी (Students) मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.

गुरुवारी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विद्यापीठाने पुन्हा हा उपक्रम सुरू केला आहे. दत्तो वामन पोतदार संकुल येथून सकाळी ११.३० च्या सुमारास या हेरिटेज वॉकची सुरवात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नितीन करमळकर, प्र कुलगुरू प्रा.एन.एस.उमराणी आणि कुलसचिव प्रा. प्रफुल्ल पवार यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी उपस्थित नागरिकांना इतिहास विभागातील प्रा. श्रद्धा कुंभोजकर, प्रा.बाबासाहेब दूधभाते, मानवशास्त्र विभागप्रमुख डॉ.शंतनू ओझरकर तसेच संशोधकांनी मार्गदर्शन केले.

Pune University
पुणे महापालिका हद्दीत ग्रामीण भागातील २१२ अंगणवाड्या वर्ग

यंदाच्या वर्षी विद्यापीठातील ऐतिहासिक मुख्य इमारतीला १५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या इमारतीत असणाऱ्या दुर्मिळ चित्रांचा वारसादेखील विद्यापीठाने जतन केला आहे. अठराव्या शतकात जेम्स वेल्स या चित्रकाराने महादजी शिंदे, नाना फडणवीस आणि सवाई माधवराव यांचे चित्र काढले होते. हे चित्र त्यावर योग्य रासायनिक प्रक्रिया करून पुन्हा मूळ स्वरूपात आणले असून मुख्य इमारतीत प्रदर्शित केले आहे. या हेरिटेज वॉकच्या निमित्ताने आज प्रथमच हे जतन केलेले चित्र सर्वांना पाहता आले. दरम्यान प्रत्येक महिन्यातून दोनदा ठराविक वेळेत नागरिकांसाठी हा 'हेरिटेज वॉक' घेण्यात येणार असून याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()