पुणे : यंदा गणपती विसर्जनाच्या दिवशी नव्हे, तर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावरील १० चौकांमधील कानठळ्या बसविणारा साउंड आणि ढोल-ताशा पथकांच्या आवाजाच्या पातळीने उच्चांक गाठला. लक्ष्मी रस्त्यावरील १० चौकांमध्ये बुधवारी सकाळी आठच्या सुमारास सरासरी १०६.७ डेसिबल आवाजाची नोंद झाली.