ऐतिहासिक कोरेगाव भीमा विजयस्तंभाचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा...

विजयस्तंभ व वढू-तुळापुरच्या विकासामुळे परिसराचा कार्यापालट होणार
Historic Koregaon Bhima Victory Pillar History of Sacrifice and Might  Deputy Chief Minister Ajit Pawar
Historic Koregaon Bhima Victory Pillar History of Sacrifice and Might Deputy Chief Minister Ajit Pawar sakal
Updated on

कोरेगाव भीमा : शौर्याचे प्रतिक असलेल्या ऐतिहासिक कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) विजयस्तंभाचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा असून येथील परिसराच्या सर्वांगिण विकासाचा निर्णय राज्यसरकारने (State Government) घेतला आहे. त्यासाठी उच्चस्तरीय व स्थानिक अधिकाऱ्यांच्या योग्य समन्वयाने शासकीय समितीही स्थापन केली असून विजयस्तंभाबरोबरच वढू-तुळापुरच्याही परिसर विकासाचा निर्णय शासनाने (Government) घेतल्याने या संपुर्ण परिसराचे चित्र पालटणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केले.

Historic Koregaon Bhima Victory Pillar History of Sacrifice and Might  Deputy Chief Minister Ajit Pawar
राजा शिवछत्रपती महाद्वार लोकार्पण सोहळ्या निमित्त नारायणगावात विविध कार्यक्रम

कोरेगाव भीमा नजीक असलेल्या पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभस्थळी अभिवादन दिनानिमित्त आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासमवेत भेट देत मानवंदना व अभिवादन केले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार तसेच माजी आमदार प्रकाश गजभिये, जयदेव गायकवाड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बार्टी व समाजकल्याण विभागाच्यावतीने समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे तसेच बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी अजित पवार, धनंजय मुंडे व संजय बनसोडे यांचा विजयस्तंभाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह देवून सन्मान केला.

Historic Koregaon Bhima Victory Pillar History of Sacrifice and Might  Deputy Chief Minister Ajit Pawar
नववर्षाच्या पहिल्या दिवशी अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भक्तांची मांदियाळी

यावेळी अजित पवार पुढे म्हणाले, विजयस्तंभाचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा असून कोरेगाव भीमा येथील १८१८च्या लढाईतील शुरवीरांचा शौर्य व पराक्रमाचा इतिहास पुढील पिढीला माहित व्हावा, यासाठी या परिसराचा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातुन सवर्ज्ञंगिण विकास करण्यासाठी परिपुर्ण आराखडा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्याचबराेबर कोरेगाव भीमा तसेच वढू-तुळापुरच्या विकासाचीही अंमलबजावणी होणार आहे. विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी भूसंपादन करणार असल्याचे सांगत याठिकाणी सर्व सोयीसुविधांसाठी, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या माध्यमातुन शासकीय उच्यस्तरीय तसेच स्थानिक समितीद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे.

दरम्यान मुंबई, पुण्यासह राज्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या तसेच १० मंत्री व २० पेक्षाही अधिक आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची बाब गांभीर्याने घेवून लॉकडाऊनबाबतही मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील टास्कफोर्सच्या बैठकीत गांभीर्याने निर्णय घेण्यात येवू शकतात. त्यासाठी जनतेनेही अधिक काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()